IMPIMP

PMC New Water Connection | …म्हणून पुणेकरांना पुढील काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन, पुणे महापालिकेचा निर्णय

by nagesh
Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – PMC New Water Connection | पुणे शहरामध्ये पाणी टंचाई (Pune City Water Shortage) जाणवत असताना पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) नव्याने समाविष्ट झालेल्या गांवांना पाणी पुरवठा (PMC Water Supply) करणे कठीण झाले आहे.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने पुणे महानगरपालिका मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शन (PMC New Water Connection) देणे तात्पुरते थांबवण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस तरी नवीन पाणी कनेक्शन मिळणार नाही.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणातील (Dam) पाणीसाठा 9 टीएमसीने खाली आला आहे.
मागील वर्षी याच कालावधीत चार धरणातील पाणीसाठा 11 टीएमसी एवढा होता.
पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी (Rural Area) पिण्याच्या गरजांसाठी पाणी आरक्षित आहे.
पाऱ्याची पातळी वाढल्याने आणि शहराचा विस्तार झाल्यामुळे संभाव्य पाणी टंचाई अपेक्षित होती, असे नागरी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी (Civil Water Supply Officer) सांगितले.
पुणे शहराला पाणी टंचाई जाणवत असल्याने पुणे महापालिका यावर उपाययोजना करत असून याचाच भाग म्हणून पुढील काही दिवस मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शन (PMC New Water Connection) न देण्याचा विचार पालिका करत आहे.

तापमान वाढल्याने पाण्याचा वापर वाढला

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department)
त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानगी थांबवण्याच्या शक्यते बाबत कळवले आहे.
या महिन्याच्या अखेरीस याचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
त्यातच मागील महिन्यापासून तापमान (Temperature) 40 अंशावर पोहचल्याने शहरामध्ये पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुणे महापालिकेला 1600 – 1700 एमएलडी (MLD) पाणी उपसा करावे लागेल जे मागील वर्षी 1250 – 1300 एमएलडी होते.

प्रक्रिया केलेले पाणी पुरवावे लागत आहे

पुणे महापालिकेच्या वतीने आतापर्यंत जलकुंभातून थेट लगतच्या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.
मात्र, आता नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना प्रक्रिया केलेले पाणी पुरवावे लागत आहे.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नुकतेच पुणे महापालिकेला नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते.
त्यामुळे पुण्यात नेमकं काय होणार हे आगामी काळात पहावे लागेल.

Web Title :- PMC New Water Connection | new water connection will not be available in
next few days decision of pune municipal corporation pmc

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Samantha Ruth Prabhu Glamorous Look | समंथानं शेअर केला अत्यंत बोल्ड लूक, स्टाईलिश ब्लाऊजवर खिळली नेटकऱ्यांची नजर..

Related Posts