IMPIMP

PMRDA | ‘पीएमआरडीए’ने गावनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणात बदल करावा

by nagesh
PMRDA | Decentralization of building permission authority within PMRDA limits! Commissioner Rahul Mahiwal's decision for dynamic administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  PMRDA | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) टाकलेल्या आरक्षणावरून तेथील शेतकरी गावनिहाय सर्वेक्षण (Survey) करून आरक्षणात बदल करावा अशी मागणी करीत आहेत. पुणे-सातारा (Pune-Satara) महामार्गानजीकच्या हवेली, भोर तालुक्याच्या पट्ट्यामध्ये बागायती क्षेत्रात विविध आरक्षणे (Reservation) टाकली आहेत. तसेच अनेक भागात रस्त्यांचे आरक्षण टाकले आहे. म्हणून या परिसरातील बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अल्प होणार आहे. तसेच त्या रस्त्यामुळे देखील अडचण निर्माण होणार आहे. म्हणून आणखी एकदा गावनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणात बदल केला जावा याबाबत या भागातील शेतकरी (Farmers) मागणी करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

PMRDA ने आपल्या भागातील विकास प्रारूप नियोजन आराखडा केला आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीचे वेगवेगळे झोन प्रस्तावित केलेत. जमिनीवर
विविध आरक्षणे (Reservation) निश्चित केली आहेत. दरम्यान यातील गाव आणि तालुकानिहाय तयार केलेला आराखडा आणि आरक्षणे असलेला
नकाशा समाज माध्यमावर प्रसारित होतोय. परंतु, पुणे-सातारा (Pune-Satara) महामार्ग रोडच्या पट्ट्यातील भोर तसेच, हवेली तालुक्याच्या पट्ट्यात
टाकलेली आरक्षणे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहेत, असा आरोप या भागातील शेतकरी (Farmers) करताना दिसत आहेत.

दरम्यान, बागायती जमिनीवर उद्यान, वाहनतळ, सांडपाणी प्रकल्प अशा विविध प्रकारची आरक्षणे टाकली आहेत. ज्या ठिकाणी नापिक क्षेत्र आहे,
पाण्याची कमतरता आहे त्याठिकाणी कृषी आरक्षण टाकले आहे. दरम्यान, यापूर्वीच या ठिकाणी पुणे-सातारा रस्ता गेला असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात गेल्या आहेत. असे असताना अजून काही प्रस्तावित रस्त्यांचे आरक्षण (Reservation) या भागातील जमिनींवर टाकण्यात आले आहे.

यावरून, नवविकास युवक शेतकरी संघटनेचे दादा पवार (Dada Pawar) म्हणाले, ‘सध्या जमिनीचे बदलण्यात आलेले झोन आणि आरक्षणे ही योग्य पाहणी करून टाकण्यात आलेली नाहीत. म्हणून बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान होणार असून या आरक्षणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावनिहाय फेरपाहणी करून, शेतकऱ्यांनी दिलेल्या हरकतींचा
विचार करून ‘PMRDA ने या आरक्षणात बदल करावा. असं त्यांनी म्हटलं आहे. आरक्षण
टाकलेल्या भागात आजही जमिनीचा मोठा भाग शेतीखाली आहे. पण, बागायती जमिनींवर
पडलेल्या विविध आरक्षणामुळे या ठिकाणी शेतीचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच रस्त्याचे आरक्षण
पडलेल्या जमिनीचा विकास करता येत नाही. म्हणून, हे लक्षात घेऊन आरक्षणात (Reservation)
बदल करण्यात यावा. अशी मागणी शिंदेवाडी येथील अण्णा शिंदे (Anna Shinde) या शेतकऱ्याने केलीय.

Web Title : pmrda conduct survey and change the reservation demand of farmers

हे देखील वाचा :

Milind Narvekar | किरीट सोमय्या यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अखेर ‘जमीनदोस्त’

Pune Crime | गरजूंच्या जमिनी पैशाच्या अमिषाने लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात, शिक्रापूर पोलिसांत 7 जणांवर गुन्हे; चौघांना अटक तर तिघे फरार

Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा पावसाची विश्रांती; जाणून घ्या कधी होणार वापसी

Related Posts