IMPIMP

PMRDA | ‘सुस- म्हाळुंगे’ गावातील सार्वजनिक हिताच्या आरक्षणाबाबत विचार केला जाईल – नगरसेवक बाबुराव चांदेरे

by nagesh
PMRDA | Public interest reservation in Sus-Mahalunge village will be considered – Corporator Baburao Chandere

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  नुकताच पीएमआरडीने (PMRDA) पुणे जिल्ह्यातील त्यांच्या अधिकारातील गावांमधील प्रारूप आराखडा जाहीर केला यामध्ये महानगरपालिकेमध्ये (Pune Corporation) समाविष्ट झालेल्या सुस- म्हाळुंगे (Sus- Mahalunge) गावासह इतर 21 गावांचा देखील समावेश आहे. नागरीकांचा समन्वय साधण्यासाठी आराखड्यात दर्शविलेल्या आरक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन पीएमआरडीचे रचनाकार शामराव चव्हाण (PMRD’s composer Shamrao Chavan), नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक (town planner Bhagyashree Dhawalsank), प्लॅनर आकाश म्हेत्रे (planner Akash Mhetre) यांनी सुस ग्रामस्थांची भैरवनाथ मंदिरामध्ये  ज्यांच्या जागेवर आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे अश्या  नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती .

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सुस गावातील नितीन चांदेरे (Nitin Chandere) यांनी सर्वे नंबर 34 ,26 ,27  यामधून रोड दर्शविण्यात आलेला आहे , सदर रस्ता पूर्वीप्रमाणे ठेवता
आला तर बरे राहील . गणेश सुतार यांनी सुचविले कि सर्वे नंबर 67, 68, 69 कीर्ती गार्डन ते सुस सर्व्हे नं . 215  सनी वर्ल्ड  पर्यंत डोंगराच्या कडेने (
खालच्या बाजूने ) 12 मीटर डीपी रस्ता (DP Road) दर्शविण्यात  यावा आणि पूर्व बाजूला 4 मीटर – पश्चिम बाजूला 4 मीटर आणि वॉकिंग ट्रॅक
दर्शविण्यात यावा कारण सुस गावांमधील सर्व डोंगर हे मालकीचे आहे तसेच नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भविष्यात नागरिकांना वॉकिंग करणे
गरजेचे असल्यामुळे येथे वॉकिंग ट्रॅक करणे गरजेचे आहे , त्यावर नगर रचनाकार श्यामराव चव्हाण यांनी सदर प्रस्तावाचे स्वागत केले आणि  निश्‍चितपणे
जनहिताचा हा प्रश्न असल्याकारणाने नागरिकांनी याची सूचना करावी असे मत त्यांनी मांडले  त्याच प्रमाणे घोडके ताई यांनी तापकीर वस्ती मधून जाणारा
रस्ता 9  मीटरचा केला तर बरे राहील कारण शेजारून सर्व्हे नं 46  मधून 30 मीटर चा रस्ता गेलेला आहे. सदर 18 मीटरचा रस्ता पूर्व-पश्चिम केला तरी
चालेल यावर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन चांदेरे (Former Deputy Sarpanch Sachin Chandere) यांनीसुद्धा या मागणीला पाठिंबा दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे (Corporator Baburao Chandere) यांनी असे सूचित केले की सदरचा पीएमआरडी ने प्रारूप आराखडा जाहीर केला त्याचे मनापासून स्वागत केले कारण समाविष्ट गावातील प्रतिनिधित्व 15 वर्षापासून करत असताना बाणेर- बालेवाडी (Baner- Balewadi) या गावांचा सन 1997  साली पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Corporation) समाविष्ट झाला परंतु तब्बल 13 वर्षांनी आमचा पार्ट डीपी मंजूर झाला तदनंतर 2 वर्षांनी आमच्या गावातील डीपीला मान्यता मिळाली ही वेळ नवीन समाविष्ट गावांवर  येऊ नये म्हणूनच राज्य सरकारच्या संमतीने पीएमआरडीने (PMRDA) जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्याचे मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar, Commissioner, Pune Municipal Corporation) यांच्या निदर्शनास आणून देतो की सुस व म्हाळुंगे  या दोन गावातील सार्वजनिक हिताची उदा. स्मशानभूमी , पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या टाक्या , घनकचरा प्रकल्प , जल शुद्धीकरण केंद्र , मैला  शुद्धीकरण केंद्र किंवा एसटीपी प्लॅन असे महत्त्वाचे आरक्षणे आपण पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व्हे करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमआरडी ला सूचना कराव्यात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी  पीएमआरडी चे नगररचनाकार श्यामराव चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की मला आज ही मिटिंग पाहून आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून समाधान वाटले कारण कि नागरिकांनी  वैयक्तिक तक्रारी पेक्षा सार्वजनिक हिताच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर केल्या आणि यामध्ये नागरिकांनी सुचविलेल्या बहुतांशी कामामध्ये थोडाफार आदल – बदल होऊ शकतो असे मत व्यक्त केले त्यामुळे प्रत्येक नागरिकांना त्यांनी आव्हान केले की  दि. ३० ऑगस्ट पर्यंत आप – आपल्या  सुचना – हरकती नोंदविल्या तर बरे राहील , त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले या विभागाच्या  खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी पीएमआरडी चे आयुक्त सुहास दिवसे साहेबांना विनंती केली की नागरिकांना सुचना – हरकती  देण्याचा कालावधी  खुप कमी  आहे त्यामुळे त्यांना कालावधी  वाढविण्यात यावा  अशी सूचना केली त्यावरून आयुक्त दिवसे साहेबांनी संबंधित मुदतवाढ मिळवण्यासाठी नगर विकास विभागाला कळविले आहे अशी माहिती शामराव चव्हाण यांनी दिली .

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सदर बैठकीला  पीएमआरडी चे नगर रचनाकार शामराव चव्हाण , नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक , प्लॅनर आकाश म्हेत्रे , नगरसेवक बाबुराव चांदेरे , सुनील चांदेरे , रामदास ससार , सुहास भोते ,नितीन चांदेरे, गोवर्धन बांदल, गणेश सुतार, गणपत चांदेरे, सचिन चांदेरे, दशरथ साळुंखे, पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, लक्ष्मण चांदेरे, युवराज चांदेरे, नामदेव चांदेरे, रोहिदास भोते ,दत्तात्रय चांदेरे, सुखदेव चांदेरे, गोपीनाथ चांदेरे, कृष्णाजी चांदेरे, सोमनाथ चांदेरे, बाळासाहेब निकाळजे, संदीप राम चांदेरे, साहेबराव चांदेरे, अमित भांबरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title : PMRDA | Public interest reservation in Sus-Mahalunge village will be considered – Corporator Baburao Chandere

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Gold Silver Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीही महागली; जाणुन घ्या लेटेस्ट दर

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

Maharashtra Police | हातभट्टी तस्कराकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Thane Crime | धक्कादायक ! अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली

Related Posts