IMPIMP

Pooja Chavan Suicide case | मद्यप्राशन करून पूजा चव्हाणने केली आत्महत्या, ‘या’ अहवालातून बाब समोर?

by bali123
Pooja Chavan Suicide case | Pooja Chavan commits suicide by drinking alcohol

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pooja Chavan Suicide case । टिक टॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide case) मागील दोन ते तीन महिने राजकारणात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याप्रकरणी राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड बाबत अनेक पुरावे प्रसारित झाल्याने या प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. मात्र एक रिपोर्ट अध्या समोर आला आहे. टिक टॉक स्टार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याशी कथित संबंध असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्येआधी मद्यप्राशन (Alcoholism) केल्याचे समोर आले आहे. मृत्यूनंतर व्हिसेरा रिपोर्ट (Viscera report) आल्यानंतर ही बाब स्पष्ट झालीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बीड मधील टिक टॉक फेमस पूजा चव्हाण (Pooja Chavan case) या तरुणीने ७ फेब्रुवारी, २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली. तिने एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या तरुणीच्या आत्महत्येनंतर वनमंत्री राठोड यांच्या संबंधाचे अनेक पुरावे प्रसारित झाले. त्यांच्यातील संभाषणाच्या क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या घरच्यांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली होती. परंतु, पोलिस तपासातून अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. या दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्या असता त्यातील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे उघडकीस आले आहे.

काय आहे अहवालामध्ये?

दरम्यान, पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan case) आत्महत्येनंतर व्हिसेरा अहवाल (Viscera report) आला आहे. या अहवालात तिच्या मानेला जबर मार लागला होता. तिच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा (Alcoholism) अंश आढळला आहे. ही बाब केमिकल अँनालायसेस अहवालात नोंद करण्यात आली आहे. व्हिसेरा अहवालानुसार पूजाने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचे यावरून निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

या दरम्यान, पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी तिचे आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते.
या संभाषणातील एक आवाज राठोड (Sanjay Rathod) यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता.
पुणे पोलिसांनी त्याला दुजोरा दिला असल्याने राठोड अडचणीत आले होते.

Web Title : Pooja Chavan Suicide case | Pooja Chavan commits suicide by drinking alcohol

हे देखील वाचा :

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

Pune Metro | ‘पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन PM मोदींच्या हस्तेच होणार’

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार? अजित पवार अन् उध्दव ठाकरे यांच्या चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘ग्रीन’ सिग्नल 

Related Posts