IMPIMP

Pune ATS | पुण्यातील युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फंडिंग ?; पुणे एटीएसकडून अटक

by nagesh
Pune Crime | Three fugitive accused of the Koyta gang, who spread terror in Nana Peth, were arrested by the crime branch along with a weapon

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – Pune ATS | पुण्यात एक मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या एका तरूणाला पुण्यातील दापोडी परिसरातून अटक (Terrorist Arrested in Pune) करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (Pune Anti-Terrorism Squad) केली आहे. जुनेद मोहम्मद (Junaid Mohammed) (वय,28) असं या तरुणाचं नाव असून काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा आरोप त्याच्यावर होता. (Pune ATS)

जुनेद मोहम्मद हा काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद (Ghazwate-al-Hind) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता असं सांगितले जात आहे. त्याची माहिती मिळाल्यावर पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून या तरूणाला अटक (Arrested) करण्यात आली. दरम्यान या तरूणाला पुणे कोर्टात (Pune Court) आज दुपारी 3 च्या सुमारास हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Pune ATS)

हा तरुण संशयित म्हणून आढळल्यावर काल दुपारपासून सदर तरूणाची चौकशी चालू होती. चौकशीत दोषी आढळून आल्यावर त्याच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. दरम्यान, मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) खामगाव येथील रहिवाशी असलेला जुनेद मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. मदरशामध्ये त्याचे शिक्षण झालं असून लष्कर-ए-तोयबाशीही (Lashkar-e-Taiba) त्याचे संबंध होते असं चौकशीतून समोर आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अटक केलेल्या युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केलं जात होतं अशी माहिती समोर येत आहे.

Web Title :- Pune ATS | Pune youth being funded by kashmir terrorists organisation pune Anti Terrorism Squad arrest Junaid Mohammed

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी; म्हणाले – ‘कुठं फेडाल ही पापं ?, कामं तरी चांगली करत चला’

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करयाचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

Related Posts