IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 391 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 391 patients of 'Corona' discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 199 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 391 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 543 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85 हजार 287 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8945 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यात 2311 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2311 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 207 रुग्ण गंभीर आहेत.
तर 291 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 10,094 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 31 लाख 72 हजार 056 तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

पुणे जिल्ह्यात 10,151 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 18 हजार 433 रुग्णांपैकी 10 लाख 89 हजार 669 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 10 हजार 151 आहे.
कोरोनाबाधित एकूण 18 हजार 613 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.43 टक्के आहे.

Web Title : Pune Corona | 391 patients of ‘Corona’ discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

PAN-Aadhaar Linking | ‘पॅन-आधार’शी लिंक करण्याबाबत नवीन अपडेट; ‘SEBI’ च्या विशेष सूचना

Pune Court | महापुरूषाची बदनामी केल्याप्रकरणात महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’

Related Posts