IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

by bali123
Pune Corona | 225 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या अडीचशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या (Pune Corona) अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 218 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 446 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 501 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8847 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 204 रुग्ण गंभीर आहेत.
तर 289 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8876 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 30 लाख 04 हजार 739 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corona | Discharge of 244 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, knowing other statistics

PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा

PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

Home Finance | आता कामगार सुद्धा खरेदी करू शकणार आपले घर, ICICI होम फायनान्सने सुरू केली ‘ऑन-द-स्पॉट’ होम लोनची सुविधा 

Related Posts