IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची (Pune Corporation)सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र, आता कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या घटल्याने ही सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता (Asim Gupta) यांनी पुणे महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)  शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली होती.

आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी आदेश काढून सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश जारी करताना त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सभागृहामध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या  50 आसन क्षमतेचा वापर करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेतील सर्व सभासदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. पुणेकरांचे प्रश्न समस्या प्रखरतेने सभागृहात मांडण्यासाठी ऑफलाईन सभा होणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे याबाबत महापौर यांना सुद्धा विनंती केली होती. यासंबंधीचे महापौर यांचे विनंती पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना पाठवण्यात आले होते. सोमवार (दि.7) सायंकाळी या संबंधी ऑफलाईन मुख्यसभा घेण्याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी (CM) स्वाक्षरी केली असल्याची माहिती प्रशांत  जगताप यांनी दिली.

नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

ऑफलाइन जीबीचे शासनाचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh
Bidkar) म्हणाले, राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता दिल्याने
नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अनेक दिवसांची प्रतीक्षा या आदेशामुळे संपली आहे.

Web Title : Pune Corporation | Principal Secretary orders Municipal Commissioner to hold general meeting of Pune Municipal Corporation offline

हे देखील वाचा :

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

Pune Corporation | मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची सभागृह नेत्यांकडून झाडाझडती, गणेश बिडकर म्हणाले – ‘आगामी काळात शिक्षणाचे सर्व विषय शिक्षण समितीसमोर आणावेत’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 218 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts