IMPIMP

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेकडून 10 लाखाच्या वसुलीचा ‘तो’ तालिबानी आदेश रद्द, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Corporation | Taliban order of recovery of Rs 10 lakh from Pune Municipal Corporation canceled, find out the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (Disaster Management Department of Pune Corporation) सर्व क्षेत्रीय कार्यालयांना (Regional Offices) प्रति दिन 10 लाख रूपयांच्या दंडाच्या वसुलीचे टार्गेट (Recovery Target) देण्यात आले होते. त्याबाबतचा आदेश उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी काढला होता. दरम्यान, पुणे मनपाच्या (Pune Corporation) तालिबानी आदेशाबाबातचे वृत्त पोलीसनामा ऑनलाइनने (Policenama Online) प्रसिध्द केले. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी सदरील आदेश ताबडतोब रद्द करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 10 लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले याचा खुलासाही मागविला आहे. सदरील आदेशात दंडाची रक्कम नजरचुकीने नमुद करण्यात आल्याचे आता उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उपायुक्त माधव जगताप यांनी प्रति दिन 10 लाख रूपयाचे दंड वसुल करण्याचे आदेश दि. 25 ऑगस्ट रोजी काढले होते. आदेशाचे पालन करत अनेक ठिकाणी जोरदार वसुली सुरू होती.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी कारवाई सुरू होती. दरम्यान, मनपाकडून केल्या जाणार्‍या
वसुलीचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे (Pune District Retail Traders Association)
तीव्र निषेध करण्यात आला. त्याबाबतची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे (president sachin nivangune) यांनी दिली होती.
तालिबानी आदेशाचे तीव्र पडसाद उमटताच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सदरील आदेश
ताबडतोब रद्द करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच उपायुक्त माधव जगताप यांनी दंडाच्या रक्कम नजरचुकीने नमुद करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तालिबानी आदेशावर पडदा पडला आहे.

Web Title : Pune Corporation | Taliban order of recovery of Rs 10 lakh from Pune Municipal Corporation canceled, find out the case

हे देखील वाचा :

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

Pune Corporation | पुणे महापालिकेचा वसुलीसाठी ‘तालिबानी’ आदेश ! प्रति दिन 10 लाख रुपये दंड वसुलीचे ‘टार्गेट’

Pune Court | खडकवासल्यातील हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी केशव अरगडे यांना जामीन

Related Posts