IMPIMP

Pune Corporation | पंचवटी ते कोथरूड बोगद्याच्या कामासाठी पुणे महापालिकेची चाचपणी सुरू

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Corporation | वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी विकास आराखड्यातील कोथरूड (Kothrud), गोखलेनगर (Gokhalenagar) आणि पाषाणला (Pashan) जोडणाऱ्या पंचवटी बोगद्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने (Pune Corporation) चाचपणी सुरू केली आहे. या कामाचा प्री फिजिबिलिटी स्टडी व पर्यावरणावरील परिणामाचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या बोगद्यामुळे या तीनही ठिकाणी जाण्यायेण्यासाठीचे 10 ते 12 कि. मी. ने अंतर कमी होणार असून वेळेचीही बचत होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महापालिकेच्या विकास आराखड्यात (pune corporation development plan) कोथरूड (Kothrud) येथील सुतार दरा ते पाषाण पंचवटी (Sutardara to Pashan Panchavati) तसेच पाषाण पंचवटी ते गोखलनगर (Pashan Panchavati to Gokhalnagar) असा सुमारे दीड कि. मी. चा वाय आकाराचा बोगदा करण्याचे नियोजित आहे. कोथरूड वरून चांदणी चौक (Chandni Chowk) ते पाषाण किंवा विधी महाविद्यालय मार्ग, सेनापती बापट रस्ता मार्गे (Senapati Bapat Road) पाषाण हा मार्ग वापरात आहे. पाषाण ते कोथरूड दरम्यान डोंगर रांग असल्याने 10 ते 12 किमी वळसा घालून जावे लागते. दोन्ही भागात मोठया प्रमाणात नागरीकरण झाल्याने वाहनांची संख्याही अधिक असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. यासाठी प्रशासनाने विकास आराखड्यातच हा बोगदा सुचिविला आहे. तसेच जुन्या विकास आराखड्यातही पौड रोड ते बालभारती आणि वडगाव ते तळजाई असे बोगदे सुचविले आहेत.

दरम्यान, पौड रोड ते बालभारती दरम्यानच्या बोगद्याला अनेक वर्षांपासून विरोध होत आहे. प्रामुख्याने या बोगद्याच्या कामामुळे पर्यावरणाला धोका पोहोचेल असा दावा स्थानिक नागरिकांसोबतच पर्यावरण प्रेमींनी केला असून वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पाषाण पंचवटी ते कोथरूड बोगद्याचे काम करायचे
झाल्यास त्याची उपयुक्तता तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम, कामासाठी घ्याव्या लागणाऱ्या
पर्यावरणासह विविध विभागाच्या परवानग्या आदी बाबींचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार
नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title : pune corporation testing of pune municipal corporation for pashan panchavati to kothrud tunnel work started

 हे देखील वाचा :

MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण

Bombay High Court | विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Related Posts