IMPIMP

Pune Corporation | रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न 11 वर्षानंतर मार्गी ! पुणे महानगरपालिकेने कारवाई करत ताब्यात घेतली जागा

by nagesh
Pune Corporation | Isnt there a crime against those big political activists who beat up the employees of the anti encroachment squad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) वतीने रास्ता पेठेत (Rasta Peth) बांधण्यात येत असलेल्या नवीन भाजी मंडईचा (New Bhaji Mandai, Pune) मार्ग अकरा वर्षानंतर मोकळा झाला आहे. या भागात असलेले बांधकाम पालिकेने काढून टाकले आहे. न्यायालयाने (Pune Court) केलेल्या सूचना आणि महानगर पालिका आयुक्तांना (PMC Commissioner) असलेल्या अधिकाराचा वापर करत मंडई विभागाने कारवाई करत ही जागा ताब्यात घेतली आहे. (Pune Corporation)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रास्ता पेठ येथे पालिकेची जुनी भाजी मंडई आहे. येथील गाळे पालिकेने भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेले आहेत. या जागेवर पालिकेच्या (Pune Corporation) माध्यमातून नवीन अद्यावत अशी भाजी मंडई उभारली जाणार आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ (बीओटी) Build Operate Transfer (BOT) तत्वावर हे काम केले जाणार असून याबाबतचा ठराव २०११ मध्ये मान्य करण्यात आला आहे. मात्र या मंडई मधील १० गाळेधारकांनी यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. याबाबत लघुवाद न्यायालयात (Ladhuwad Court) दावा देखील दाखल करण्यात आला होता. या भागातील काही मंडळींनी याला विरोध केल्याने वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. या जागेत नव्याने मंडई उभारली जाणार असल्याने पार्किंग, जीना, लिफ्ट तसेच बांधकाम करताना आजूबाजूला आवश्यक ती जागा सोडावी लागणार असल्याने या गाळाधारकांना नऊ चौरस फुटांच्या ऐवजी सात फुटाचा गाळा देण्याची तयारी पालिकेने दाखविली होती. मात्र याला देखील गाळा धारकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला होता.

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

ही जागा पालिकेच्या मालकीची असून पालिकेने ती भाडेतत्वावर दिलेली आहे. येथे पालिकेला नवीन मंडई उभारायची आहे.
त्यासाठी भाडेकरू यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने संबंधितांना नोटीस दिली होती.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ८१ ब (१) (क) या नियमानुसार ही नोटीस देण्यात आली होती.
योग्य ती प्रक्रिया राबवून ही जागा ताब्यात घ्यावी, यामध्ये कोणालाही बेदखल करू नये, अशा सूचना याबाबत दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सुनावणी करताना लघुवाद न्यायालयाने केल्या होत्या.
त्याचे पालन करून आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती मंडई विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
या गालाधारकांचे तात्पुरते पुनर्वसन देखील केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी (PMC Officer) स्पष्ट केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोट…

गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. या ठिकाणी मंडई विभागा मार्फत बीओटी तत्त्वावर नवीन अद्यावत मंडईचे बांधकाम करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या आवश्यक त्या सूचनांची पूर्तता करून गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

– माधव जगताप, उपायुक्त, पुणे महानगपालिका (Madhav Jagtap, Deputy Commissioner, Pune Municipal Corporation)

Web Title :-  Pune Corporation | The problem of the market in Rasta Peth is solved after 11 years! Pune Municipal Corporation took action and took possession of the land

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय होणार आणि एकहाती सत्ता येणारच’

Pollen Allergy | वसंत ऋतुमध्ये काही लोकांना खुप त्रस्त करू शकते ‘पोलन अ‍ॅलर्जी’, जाणून घ्या तिची 7 लक्षणे आणि बचाव

Pune Crime | घरफोडी, मोबाईल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Related Posts