IMPIMP

Pune Court | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 15 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

by nagesh
Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Court | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या तिच्या प्रियकराला न्यायालयाने १५ वर्ष सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून मुलीला एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने (Pune Court) दिले आहेत. मुलगी गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात करण्यासाठी दवाखान्यात गेल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. के. जहागीरदार (Special Court Judge KK jahagirdar)
यांनी हा निकाल दिला. ऋषीराज बाबासाहेब शेळके Rishiraj Babasaheb Shelke (वय-२२,रा.भांडगाव, ता.दाैंड,पुणे) असे शिक्षा सुनावन्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
याबाबत पिडित मुलीने पुण्यातील येरवडा पाेलीस ठाण्यात (Yerwada Police Station) डिसेंबर २०१७ मध्ये तक्रार दाखल केली हाेती.
शेळके आणि संबंधित मुलीची येरवडा येथील एका महाविद्यालयात ओळख झाली हाेती.
एकमेकांशी फाेनवर बाेलू लागल्यांनतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले.
त्यातूनच एकदिवस शेळके याने मुलीस माझे तुझ्यावर प्रेम असून तु सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले.

त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये त्याने मुलीस एका लाॅजवर नेऊन तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला व तिला पुन्हा महाविद्यालयात साेडले.
मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजला.
त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला.
मात्र, गर्भपाताची माहिती डाॅक्टरांनी पाेलीसांना दिली व पाेलीसांनी पिडितेचा जबाब नाेंदवला त्यात तिने शेळके याचे नाव घेतले.
त्यानंतर पाेलीसांनी त्याच्या विराेधात गुन्हा दाखल करुन गर्भाचा डीएनए तपासणीस पाठवून खातरजमा केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे (Government Advocate Arundhati Bramhe) यांनी पाहिले.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले.
या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम (PSI Shubhangi Magdoom) यांनी केला. न्यायालयीन सुनावणीत पिडित बालिका अज्ञान असल्याचे व तिचा गर्भपात व रासयनिक प्रयाेगशाळा तपासणीचा डीएनए अहवाल यावरुन आराेपीच गर्भाचा जनुकीय पिता असल्याचा युक्तिवाद ब्रम्हे यांनी केला. न्यायालयाने पिडिता व डाॅक्टरांची साक्ष ग्राहय मानत आराेपीला बलात्कार प्रकरणी १२ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १२ हजार रुपये दंड शिक्षा ठाेठवली.
तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजार दंडाची शिक्षा दिली. दाेन्ही शिक्षा आराेपीस एकत्र भाेगायच्या आहे.
तसेच फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title : Pune Court | Boyfriend sentenced to 15 years hard labor for raping minor girl; Court orders payment of Rs 1 lakh as compensation

हे देखील वाचा :

Salary Plus Account | जर तुमचे सुद्धा असेल ‘या’ बँकेत सॅलरी अकाऊंट, तर मिळेल एक कोटी रुपयांची ‘फ्री’ सुविधा; जाणून घ्या

Karuna Sharma | करुणा शर्मांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच, ‘या’ कारणामुळं सुनावणी 18 तारखेला

Sangli Crime | सांगलीतील बडया व्यावसायिकाची कोटयावधी रूपयांची फसवणूक, दुबईतील चौघांविरूध्द गुन्हा

Related Posts