IMPIMP

Pune Court | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणातून खून करणाऱ्याला जन्मठेप

by nagesh
Pune Court | harassment of a minor student! Three years hard labor for a teacher in Chinchwad; A fine of Rs 50,000

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Court | किरकोळ भांडणाच्या रागातून फरशी डोक्यात मारून खून करणा-याला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव (District and Sessions Judge P. P. Jadhav) यांनी जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या वादातून २०१५ साली हा खून (Murder) करण्यात (Pune Court) आला होता.

दिपक सुदाम गायकवाड (वय २७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. रोहन घोडके (वय ३६) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत रोहन यांचे भाऊ रोहित यांनी फिर्याद दिली आहे. २८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एका गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत टिळक रोड परिसरात सुरू असताना दिपक हा त्यामध्ये नाचत होता.
मंडळाचे कार्यकर्ते श्रीपाद शेळके यांच्या मुलीस त्याचा धक्का लागला.
या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
त्यावेळी शेळके यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकत्र्यांनी दिपक याला समजून सांगितल्याने त्याने माफी मागितली. त्यानंतर फिर्यादी हे मिरवणूक सोडून पत्नीला घेण्यासाठी घरी गेले होते.
त्यानंतर काही वेळाने दिपक हा त्या ठिकाणी आला आणि शेळके कुठे आहे.
त्याच्या मुलीला धक्का मारलेला नसताना ही त्याने मला मारहाण केली, असे म्हणाला.
त्यावेळी रोहन हा शेळके कोठे आहे हे मला माहित नाही, असे म्हणाल्याने त्याचा राग मनात धरून ‘तुझा कसा
काटा काढतो’ असे म्हणत दिपक याने फरशी उचलून ती रोहन याच्या डोक्यात व हातावर मारून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील (Government Advocate Vilas Ghogre-Patil) यांनी काम पाहिले.
खटल्यात त्यांनी आठ साक्षीदार तपासले. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. घोगरे-पाटील यांनी युक्तीवादा दरम्यान केली.
त्यानुसार न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर (Assistant Inspector of Police Ashok Ipper) यांनी गुन्ह्याचा तपास केला.
न्यायालयीन कामकाजात खडक पोलीस ठाण्याचे (Khadak Police Station) पोलीस हवालदार दिलीप मांडेकर यांनी मदत केली.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल असे ही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title : Pune Court | Life imprisonment for the murderer due to a minor quarrel while dancing in the Ganesha immersion procession

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त दराने मिळतंय, जाणून घ्या नवीन दर

Sharad Pawar | मनपा निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य – शरद पवार

Pune Corporation | मैलापाणी शुध्दीकरणातील ऑनलाईन कंटीन्युएस एफ्ल्यूएंट मॉनिटरिंग सिस्टीम विकसित; महाराष्ट्रातील पुणे ही पहिली महापालिका

Related Posts