IMPIMP

Pune Court | अनैतिक संबंधातून मित्राचा खुन करणार्‍या महिलेचा जामीन फेटाळला; विमाननगर परिसरात झाला होता ‘मर्डर’

by nagesh
https://policenama.com/pune-crime-murder-of-a-woman-who-refuses-to-have-an-affair-the-accused-fled-after-throwing-the-body-in-the-bathroom-in-lohegaon-of-vimannagar-police-station-limits/

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Court | अनैतिक संबंधातून मित्राचा दांडक्याने मारहाण करून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर (Judge B. P. Kshirsagar) यांना हा आदेश दिला.

शबनम हनिफ शेख उर्फ तन्वी राहूल वाघेला (वय 30, रा. गुरूव्दारा कॉलनी, भुकनवस्ती, लोहगाव) असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सनी उर्फ शन्नु सुदाम गाडे (वय 29), मोहम्मद शरीफहुसेन कुरेशी (वय 23 ) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय 36, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सुमित दिलीप जगताप (वय 34, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस नार्इक गणपत सिताराम केंगले यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman nagar police station) गुन्हा दाखल आहे. लोहगावमधील ब्रम्हदेव नर्सरीजवळ 3 एप्रिल 2021 रोजी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी अर्जदार महिलेचा त्यात सक्रीय सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तपासादरम्यान, आरोपी महिलेच्या घरझडतीत सापडलेल्या मोबाईलमध्ये चित्रफित आढळून आली आहे. त्यात खुन होण्याच्या पूर्वी 3 एप्रिल रोजी सुमित जगताप, सनी उर्फ शन्नु गाडे, शबनम शेख उर्फ तन्वी वाघेला, सलीम शेख, मोहम्मद कुरेशी हे लोहगाव जवळील कलवड वस्ती (lohegaon kalwad wasti) भागात मद्यप्राशन करून नाचत असताना दिसत आहेत.
खुन होण्यापूर्वी सुमित आणि चारही आरोपी हे एकत्र दारू पित असल्याचे दिसून आले आहे.
आरोपी महिलेने सुमित यास प्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
आरोपी शबनम शेख हिची लोहगाव भागात दहशत आहे.
तीला जामीन भेटला तर ती साक्षीदारावर दबाव टाकू शकते? त्यामुळे तीचा जामीन अर्ज फेटाळावा अशी
मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Government Advocate Premkumar Agarwal) यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title : Pune Court | The bail of the woman who killed her friend in an immoral relationship was rejected; Murder in Vimannagar area

हे देखील वाचा :

Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार ! शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राणेंना ‘शह’

Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts