IMPIMP

Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | व्हायरल व्हिडिओवर पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट, पण… (Video)

by sachinsitapure

पुणे : Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्श कार चालवून मोटरसायकवर जाणाऱ्या एका तरूणाला आणि तरूणीला पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही ठार झाले. या घटनेनंतर धक्कादायक खुलासे झाल्याने ही घटना राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आरोपीच्या बारमधील व्हायरल व्हिडिओबाबत माहिती दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या अपघातातील आरोपी हा अल्पवयीन आहे, तसेच त्याचे वडील प्रसिद्ध बिल्डर असल्याने त्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाचे दारू सेवन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, या प्रकरणाच्या तपासासाठी पथक नेमण्यात आले आहे. युद्धपातळीवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. सामग्री, अल्कोहोल आदी सर्व दृष्टीकोनातून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ब्लडचे रिपोर्ट आलेले नाहीत.

पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने मद्यप्राशन केले होते. दोन्ही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात ते मद्यप्राशन करताना दिसत आहेत. त्यांनी दारू प्यायल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केले आहे. ही दारूची ऑनलाईन पेमेंट आहेत. यातून स्पष्ट झाले आहे की त्यांनी मद्यप्राशन केले होते. परंतु, रक्ताचा अहवाल आल्यानंतरच याचा खुलासा होईल.

महत्वाची माहिती देताना पोलिस आयुक्त म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोन आले होते. पोलीस महासंचालक यांनीही सूचना दिली आहे. सर्वांची सूचना स्पष्ट आहे की पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागेल. दोषींविरोधात कडक कारवाई व्हायला पाहिजे.

अमितेश कुमार म्हणाले, पुढील निर्णय येईपर्यंत अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याबाबतही न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. परंतु, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे, संबंधित आरोपीला प्रौढ आरोपीनुसार कलम ३०२ (हत्येचा गुन्हा) लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या प्रकरणात अल्पवयीन आरोपी वडिलांना अटक करण्यात आली होती. आता बार मालकासह मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असताना त्याला दारु देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

Chandrashekhar Bawankule | लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक, मतदान संपताच चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Related Posts