IMPIMP

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनादिवशी गुन्हे शाखेची कारवाई

by nagesh
Pune Crime News | Two of the Koyta gang who terrorized Hadapsar were arrested, chased and chained to the sugarcane forest in Pabal.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गांजाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) अटक केली. ही कारवाई लोणी काळभोर परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून 20 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा (Marijuana), दुचाकी, मोबाईल, असा एकूण 4 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ दिनादिवशी ही करावाई (Pune Crime) करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कुमार अनिल नितळे Kumar Anil Nitale (वय-30 रा. लोणी स्टेशन, ता. हवेली) आणि ऋषीकेश रमेश बेले Rishikesh Ramesh Bele (वय-24 रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) पथकासह हडपसर (Hadapsar Police Station) आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कदमवाक वस्ती भागात दोनजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मोहिते (Yogesh Mohite) यांना मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये 20 किलो 200 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, दुचाकी असा एकूण 4 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलीस,
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
अंमलदार मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मनोज साळुंके, संदिप शिर्के, संदिप जाधव, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | 20 kg cannabis seized from cannabis dealers for sale, Pune Police Crime Branch action on World Anti-Drug Day

हे देखील वाचा :

Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरकडे 10 लाखाची खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण

ED Summons Sanjay Raut | शिवसेनेला आणखी एक धक्का ! संजय राऊतांना ईडीचे समन्स

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’, आनंदी झाला करण जौहर; कपूर कुटुंबात उत्सव

Related Posts