IMPIMP

Pune Crime | दुर्दैवी ! मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून 21 वर्षीय नवविवाहीतेचा मृत्यू

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव (Lakhangaon) येथील एक धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये ओढणी गुंतून गळफास लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ही दुर्देवी घटना मंगळवारी घडली. सोनाली अजय दौंड (Sonali Ajay Daund) (वय 21) असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी, लाखनगाव येथील गव्हाळी मळ्यात राहणारी सोनाली दौंड यांचा विवाह 6 महिन्यापूर्वी झाला होता. दौंड कुटुंबियांचा दुग्ध
व्यवसाय असून सकाळी सोनाली जनावरांचे खाद्याची कुट्टी करण्यासाठी गोठ्यात गेली होती. त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हते. कुटीमध्ये पेंढी घालत
असताना पेंढी बरोबर तिचा दुपट्टा आतमध्ये ओढला गेला. दुपट्टाची दोन्ही बाजू आत गेल्याने तिला गळफास बसला. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू (Pune
Crime) झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, सुभाष दौंड (Subhash Daund) हे शेतात मेथीला तन नाशक मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी नवनाथ लक्ष्मण रोडे (Navnath Laxman
Road) व वैभव रामदास पडवळ (Vaibhav Ramdas Padwal) यांनी याबाबत माहिती त्यांना दिली. सुनील यांनी सोनाली दौंड याची कडबा कुट्टी मशीन
मधून सुटका केली. सोनाली या कुठलीही हालचाल करत नव्हत्या. यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित
केले. दरम्यान, या घटनेबाबत मंचर पोलिसांत (Manchar Police Station) नोंद झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Pune Crime) करीत
आहेत.

Web Title :- Pune Crime | 21 year old newly married woman dies after being strangled machine lakhangaon of manchar police station area pune rural police

हे देखील वाचा :

Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती

Akshara Singh | स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक शॉट्समध्ये अभिनेत्री अक्षरा सिंहनं केली फ्लॉन्ट फिगर, व्हिडीओ पाहून उडतील होश

Maharashtra Rains | आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ 13 जिल्ह्यांना हाय ‘Alert’

Related Posts