IMPIMP

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपाच्या डिलरशिप देण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Woman cheated 10 people with the lure of job abroad, FIR in Samarth police station

पुणे: सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | स्वत:च्या मोकळ्या जागेत पेट्रोल पंप (Petrol Pump) सुरु करण्यासाठी ऑनलाईन जाहिरात वाचून संपर्क करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. पेट्रोल पंपाची डिलरशिप (Dealership) देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल 42 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली. आरोपींनी कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक (Pune Crime) केली. हा प्रकार 4 ते 17 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत मान हिंजवडी फेज एक (Maan Hinjewadi Phase 1) येथे राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान अमजअली (रा. पश्चिम बंगाल), शर्मिला कुमारी (रा. बिहार), रीना कुमारी (रा. टी चॅपल रोड, रनवार बांद्रा) मोबाईलधारक यादव या चौघांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी लागणारी मोकळी जागा आहे. त्यांना ऑनलाईन पेट्रोल पंपाच्या जाहिरातीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संपर्क साधला. परंतु प्रत्यक्षात सायबर चोरट्यांनी रचलेल्या सापळ्यात फिर्यादी अडकले.

आरोपींनी फिर्यादी यांना आयओएल पेट्रोल पंपाची (IOL Petrol Pump) डीलरशिप देण्याचे प्रलोभन दाखवून कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवले.
आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी वेळोवेळी 42 लाख 25 हजार रुपये ऑनलाईन दिले.
दरम्यान पैसे भरुन ही डिलरशिप मिळत नसल्याने त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला.
मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | 42 lakhs extorted under the pretext of giving a petrol pump dealership in pune

हे देखील वाचा :

Pune Crime | आयटी कंपनीत कामाला असलेल्या तरुणालाच सायबर चोरट्यांनी गंडविले

Pune PMC News | राज्यातील सत्ता बदलाचा असाही परिणाम ! केबल डक्टच्या कामाचे 12 कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेवर ‘राजकिय’ प्रेशर; अखेर महापालिकेने ‘देणे’ भागवून उत्पन्न मिळविण्यासाठी निविदा काढल्या

Pune Child Sexual Abuse Case | बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी मारुती सांवंत यांना पाच वर्षाची शिक्षा

Related Posts