IMPIMP

Pune Crime | म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक करणार्‍या भूमी कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A case has been filed against Bhumi Construction for defrauding beneficiaries including MHADA

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) तसेच लाभार्थ्थीची फसवणूक (Fraud Case) करुन १५ सदनिकाधारकांकडून घेतलेले २ ते ४ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundagarden Police) बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भूमी कन्स्ट्रक्शनचे (Bhumi Construction) पंकज प्रकाश येवला Pankaj Prakash Yevla (वय ३५, रा. स्रेहल रेसिडेन्सी, माणिक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे (Construction Professional) नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी म्हाडाचे (MHADA) मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकुर Vijay Shankar Thakur (वय ४३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०९/२२) दिली आहे. हा प्रकार भूमी कन्स्ट्रक्शनच्या रहाटणी येथील भूमी ब्लेसिंग प्रकल्पात जून २०१९ ते जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या नियमाप्रमाणे ४ हजार चौ.मीटर . क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळातील मंजूर अभिन्यासात एकुण क्षेत्रफळाच्या २० टक्के क्षेत्रफळावर विकासकाने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाअंतर्गत सदनिका म्हाडाला उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मे २०१९ मध्ये म्हाडाने काढलेल्या लॉटरीत भुमी कंन्ट्रक्शन तर्फे पंकज येवला यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील भुमी ब्लेसिंग या प्रकल्पाचा देखील समावेश होता. त्यानुसार भूमी ब्लेसिंग प्रकल्पात १८ सदनिका उपलब्ध करुन देणे अपेक्षित होते. त्यानुसार म्हाडाने १८ सदनिकांची लॉटरी पद्धतीने सोडत काढली. त्यामधील एकूण १५ सदनिका धारकांची नावे निश्चित करुन त्यांना देकार पत्र दिले. त्यांची नावे बिल्डरला कळविली. भूूमी कन्स्ट्रक्शन यांनी करार करुन या सदनिकाधारकांनी विविध बँकांमधून कर्ज काढून सुमारे ६० ते ७० टक्के रक्कम भूमी कन्स्ट्रक्शन यांना दिली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी सदनिकांचा ताबा त्यांना देण्यात आला नाही. त्याबाबत त्यांनी म्हाडाकडे वारंवार तक्रारी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वारंवार ताबा मिळण्यासाठी उशीर होत असल्याच्या कारणातून लाभार्थी एस.के. चकोर (S.K. Chakor) यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी तक्रार अर्ज सादर केला. त्यानंतर म्हाडाने येवला यांच्या सोबत तत्काळ पत्रव्यवहार करून प्रकरण गार्भीयाने घेऊन बांधकाम पूर्ण करून लाभार्थ्यांना ताबा देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर देखील काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर इतर लाभार्थ्यांनी याबाबत म्हाडाकडे तक्रारी केल्या होत्या. येवला यांच्यासोबत पुणे म्हाडाचे (MHADA Pune) मुख्य अधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी ३१ मार्च २०२२ च्या अगोदर सर्व लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर देखील येवला यांच्याकडून कार्यवाही झाली नाही. (Pune Crime)

त्यामुळे ८ लाभार्थ्यांनी सदनिकेचा ताबा मिळत नसल्यामुळे उपोषणास बसणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले होते.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर म्हाडाने संबंधीत प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम व्यवसायिक येवला यांना हा प्रकल्प पुर्ण होणार नाही याची जाणीव असताना,
प्रकल्पाचा प्रस्ताव स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी दुष्ट व कुटील हेतूने म्हाडा व लाभार्थ्यांची फसवणूक करून १५ सदनिकांसाठी
त्यांनी दिलेले २ ते ४ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लंबे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been filed against Bhumi Construction for defrauding beneficiaries including MHADA

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील उच्चभ्रु परिसरातील स्पा सेंटरमधील ‘सेक्स’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चार तरुणींची सुटका

Rain in Maharashtra | मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढील 8 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, परिसरात खळबळ

Related Posts