IMPIMP

Pune Crime | देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवर बदनामी करणार्‍यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बदनामी करुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या अनिल हरपळे Anil Harpale (पाटील) ९६ कुळी मराठा या ट्विटर आयडी धारकावर लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी संदिप सोमनाथ सातव Sandeep Somnath Satav (वय ३८, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु़ रजि़ नं. ६३०/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हरपळे (पाटील) ९६ कुळी मराठा या ट्विटर धारकाने खुर्ची मिळवली पण होती नव्हती ती इज्जत गमावली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल. काही वर्षात तुमचा नारायण राणे होईल (कुत्र विचारणार नाही तुम्हाला), असे ट्विट व त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट जोडले आहे. (Pune Crime)

त्यात तुमच्या सोबत २४ तास सोबत राहणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो, माझ्यासोबत तुम्ही बेईमानी
कराल तर मी बदला नक्कीच घेईन, बेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली, होय मी बदला घेतला,
असे ट्विट केलेले आहे. त्यात वर अनिल हरपळे (पाटील) ९६ कुळी मराठा या ट्विटर आयडीवरुन
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो व त्या फोटोवर समाजातील दोन गटांमध्ये शांतता, एकोपा,
बिघडवण्याच्या उद्देशाने द्वेष भावना वाढीस घालून ट्विट करुन फडणवीस यांची बदनामी केली,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे (Sub-Inspector of Police Suraj Gore) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | A case has been registered in Lonikand police station against the defamer of Devendra Fadnavis on Twitter

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | पॅरोलवर असलेल्या कैद्याकडून लाच घेणे पडले महागात, येरवडा कारागृहातील हवालदारासह महिलेला अटक

MSEDCL | वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन

Sanjay Raut | ‘कारागृहात माझे 10 किलो वजन कमी झाले’ – संजय राऊत

Related Posts