IMPIMP

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

by nagesh
Pune Crime | a person suicide after beating for interest money in chakan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | व्याजाच्या पैशांसाठी मारहाण केल्याने एकाने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. हि घटना म्हाळुंगे परिसरात घडली असून धंनजय रेड्डी असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी (Pune Crime) लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे मागत होते. त्यांनी तगादा लावला होता. त्रास देऊन मारहाण ही करत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच चिठ्ठीत सूरज याच्या नावाचा उल्लेख केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, पोलिसांनी व्याजाने पैसे देणारा सूरज गुरव याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी फिर्याद धंनजय रेड्डी यांचा भाऊ योगेश रेड्डी यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी बंधूची चाकण परिसरात कंपनी असून ती चालवण्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी त्यांनी सूरज गुरवकडून १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकांकडूनही त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे घेताना धनंजय याने मध्यस्थी केली होती. दरम्यानच्या काळात परिस्थिती खालावल्याने वेळेत व्याज देता येत नव्हते. त्यामुळे सूरज गुरव याने योगेश यांना गाडीत बळजबरीने बसवून नेऊन त्यांना मारहाण करत धमकावले होते. याच त्रासाला कंटाळून भाऊ धंनजय यांनी बंद फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Web Titel :- Pune Crime | a person suicide after beating for interest money in chakan

हे देखील वाचा :

Crime News | उल्हासनगर येथे 14 वर्षीय मुलीला मारहाण करत केला बलात्कार

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ‘या’ सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून खळबळजनक वक्तव्य, राऊतांनी केला हल्लाबोल

Related Posts