IMPIMP

Pune Crime | महिलेचा गळ्यावर वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून, चाकण परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

चाकण : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुण्यातील मोठी औद्योगिक वसाहत (Chakan Industrial Estate) असलेल्या चाकण (म्हाळुंगे) परिसरामध्ये एका महिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) या महिलेचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना (Pune Crime) खराबवाडी गावच्या हद्दीमध्ये रविवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी हनुमंत वसंत बांगर Hanumant Vasant Bangar (वय-36) यांनी महाळुंगे पोलीस चौकीत (Mahalunge Police Chowki) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी 302 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या (महाळुंगे) खराबवाडी येथील वाण्याचा मळा या ठिकाणी झुडपात 25 ते 27 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.
महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून दगडाने ठेचण्यात आला आहे.
अद्याप या महिलेची ओळख पटली नाही. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे (Senior Police Inspector Sable) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

हे देखील वाचा :

Tushar Gandhi | ‘महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती’ – तुषार गांधी

Areez Khambatta Passes Away | संपूर्ण भारताला ‘रसना’ची सवय लावणारे अरीज खंबाटा काळाच्या पडद्या आड

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Shivsena Leader Sanjay Pawar | शिवसेना नेत्याचं कोल्हापुरात विधान, म्हणाले – ‘बाप हा बाप असतो, त्यात जुना बाप आणि नवा बाप असे काही नसते’

Related Posts