IMPIMP

Pune Crime | गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पुण्यात तरुणाचा खून, 5 जणांना अटक

by nagesh
Pune Crime | A young man was killed in Pune due to being hit by a car 5 people were arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाला. यानंतर पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर पालघनने वार करुन खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना कोंढवा येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री आठच्या सुमारास कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथील शिवनेरीनगर (Pune Crime) येथे घडली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महेश लक्ष्मण गुजर Mahesh Laxman Gujar (वय – 23 रा. कोंढवा खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमर कैलास गव्हाणे Amar Kailas Gavane (वय – 34), राजकुमार लक्ष्मण पवार Rajkumar Laxman Pawar (वय – 29), कृष्णा गणेश मराठे Krishna Ganesh Marathe (वय – 31), सचिन विष्णु राठोड Sachin Vishnu Rathod (वय – 22), गणेश सिजाराम हाके Ganesh Sijaram Hake (वय – 46 सर्व रा. कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सोनी गुजर Soni Gujjar (वय – 21) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुजर आणि आरोपी शिवनेरी नगर परिसरात राहतात.
काही दिवसांपूर्वी महेशच्या गाडीचा धक्का आरोपी अमरला लागला होता.
त्याचा राग मनात धरून बुधवारी रात्री आठच्या सुमारास आरोपींनी महेशवर पालघनने वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle) करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | A young man was killed in Pune due to being hit by a car 5 people were arrested

हे देखील वाचा :

Raw Milk | कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक की नुकसानकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

Har Ghar Tiranga | जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

Soup and Salad | ‘सूप आणि सलाड’चे अशाप्रकारे करू नका सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

Related Posts