IMPIMP

Pune Crime | आयटी कंपनीत कामाला असलेल्या तरुणालाच सायबर चोरट्यांनी गंडविले

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | आपला पासवर्ड कोणाला सांगू नये, याविषयी बँका सातत्याने सांगत असतात. असे असताना आय टी कंपनीत (IT company) कामाला असलेल्या व सायबर गुन्हेगारीविषयी (Cyber Crime) माहिती असलेल्या एका तरुणाला (Pune Crime) सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) गंडविले. पॅनकार्ड अपडेट (PAN Card Update) करायचे असल्याचे सांगून त्याच्या बँक खात्यातुन 2 लाख 69 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud) केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी मांजरी येथे राहणार्‍या एका 40 वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 22 जानेवारी रोजी घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय टी कंपनीत कामाला आहेत. त्यांना एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. त्यात तुमचे पॅन कार्ड दिलेल्या लिंकवर अपडेट केले नाही तर तुमचे अ‍ॅप ब्लॉक होईल असे लिहीले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या लिंक वर क्लिक केले. त्यावर त्यांचा युझर नेम व पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांनी पॅन कार्ड नंबर टाकला. त्याबरोबर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी आला.

त्यांनी तो ओटीपी त्या लिंकवर टाकला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर 20 टक्के प्रोसेस पूर्ण झाल्याचे दिसले. त्यानंतर पुन्हा एक पासवर्ड आला. त्यांनी पुन्हा तो पासवर्ड पुन्हा दिलेल्या लिंकवर टाकला. त्याबरोबर पॅन कार्ड प्रोसेस 40 टक्के पूर्ण झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना एका पाठोपाठ चार ओटीपी आले. ते त्यांनी लिंकवर टाकत गेले. त्यानंतर त्यांची पॅन कार्ड अपडेट प्रक्रीया पूर्ण झाल्याचे दाखवत होते.

काही वेळाने त्यांना मित्राला पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी बँकेचा अकाऊंट बॅलन्स चेक केला.
तेव्हा खात्यात पुरेसे पैसे नसल्याचे दिसून आले.
अर्ध्या तासात सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातील 2 लाख 69 हजार रुपयांवर डल्ला मारला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | A young man working in an IT company was robbed by cyber criminals

हे देखील वाचा :

Pune Child Sexual Abuse Case | बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी मारुती सांवंत यांना पाच वर्षाची शिक्षा

Pune PMC News | राज्यातील सत्ता बदलाचा असाही परिणाम ! केबल डक्टच्या कामाचे 12 कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेवर ‘राजकिय’ प्रेशर; अखेर महापालिकेने ‘देणे’ भागवून उत्पन्न मिळविण्यासाठी निविदा काढल्या

Pune PMC News | केशवनगर येथे गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीररित्या व्यावसायीक वापर ! बोगस पुराव्यांच्या आधारे जागा मिळवून देणार्‍या ‘दलालांचा’ सुळसुळाट

Related Posts