IMPIMP

Pune Crime | रुम साफ करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दोघांमधील भांडणात रुम साफ करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) वारजेमध्ये (Warje, Pune) घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Waraje Police) विशाल गायकवाड Vishal Gaikwad (रा. म्हाडा कॉलनी, वारजे) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

या घटनेत योगेश चंद्रकांत धर्माधिकारी Yogesh Chandrakant Dharmadhikari (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९९/२२) दिली आहे. त्यात योगेश व दिनेश बनसोडे (Dinesh Bansode) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार म्हाडा कॉलनीत शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडला. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश धर्माधिकारी हे त्यांच्या ओळखीच्या दिनेश बनसोडे यांची रुम साफ करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी तिसर्‍या मजल्यावर राहणारा विशाल गायकवाड हा तेथे आला.
त्याने तु का या बिल्डिंगमध्ये राहायला आहे का असे विचारले.
तेव्हा फिर्यादीने दिनेशची रुम साफ करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावर विशाल याने फिर्यादीची गचांडी पकडून त्याचे आणि माझे भांडण आहे.
तु त्याचेकडे का काम करतो, असे म्हणून फिर्यादीस फरफटत रुमसमोर नेऊन बांबु घेऊन तुला जीवंत सोडत नाही असे म्हणून डोक्यात बांबु मारुन जखमी केले.
फिर्यादी याचा आवाज ऐकून दिनेश बनसोडे व दिव्या किर (Divya Kir) हे त्यांना सोडविण्यासाठी आले.
तेव्हा विशाल गायकवाड याने घरात जाऊन कोयता घेऊन येऊन त्याने फिर्यादीच्या पायावर व दिनेश याच्या पोटात मारुन जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक रायकर (Assistant Police Inspector Raikar) तपास करीत आहेत.

 
Web Title : – Pune Crime | An attempt was made to kill a young man who had come to clean the room by stabbing him

Related Posts