IMPIMP

Pune Crime | ‘वास्तूशोध’च्या बिल्डर कुलकर्णी बंधूंवर फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | परवडणार्‍या घरांची जाहिरात करुन ग्राहकांची फसवणूक (Cheating) केल्या प्रकरणात ‘वास्तूशोध’च्या कुलकर्णी बंधुंवर आणखी एक गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सचिन बाळकृष्ण कुलकर्णी (Sachin Balkrishna Kulkarni) आणि नितीन बाळकृष्ण कुलकर्णी Nitin Balkrishna Kulkarni (दोघे रा. लोटस प्लाझा, कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिलिंंद चिंतामणी ताजणे Milind Chintamani Tanjne (वय ४८, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (alankar police station) फिर्याद दिली आहे.

वास्तू शोध (vastu shodh) यांच्या सातारा (Satara) जिल्ह्यातील खंडाळा (khandala) येथील अर्बनग्राम (urbangram) या प्रकल्पात ताजणे यांनी ४०३ ही सदनिका खरेदी केली होती. खंडाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त करुन त्यांची एप्रिल २०१६ मध्ये नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी ११ लाख २७ हजार ४१८ रुपये कंपनीच्या अकाऊंटवर पाठविले होते. त्यांनी खरेदी केलेल्या सदनिकेचे बांधकाम अपूर्ण ठेवून फिर्यादी यांना अदयाप ताबा दिला नाही. तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांना दिलेला ७ लाख ८१ हजार ९६१ रुपयांचा धनादेश न वटता परत आला. म्हणून त्यांनी फिर्याद दिली आहे.

कोंढवे धावडे (kondhawe dhawade) येथील प्रकल्पातील फ्लॅटसाठी कुलकर्णी बंधु यांनी १८ सदस्यांकडून ५ कोटी ७० लाख रुपये घेतले.
त्यानंतर बांधकाम बंद केले.
त्यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यावरुन पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात सचिन व नितीन कुलकर्णी या दोघांना अटक केली होती.
मुंबई (Mumbai), उल्हासनगर (ulhasnagar), ठाणे (Thane) व पुणे शहरातील इतर गुंतवणुकदारांनीही त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत.

Web Title : Pune Crime | Another case of fraud has been registered against the builder Sachin Balkrishna Kulkarni and Nitin Balkrishna Kulkarni of Vastu shodh

हे देखील वाचा :

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या

High Return Stocks | ‘हे’ शेयर्स करताहेत पैशाचा वर्षाव! करा इथं ‘इन्व्हेस्ट’, एका झटक्यात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

Dr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच आमदार सुनील कांबळे एक – डॉ. नीलम गोर्‍हे (व्हिडीओ)

Related Posts