IMPIMP

Pune Crime | बिटकॉईनमधील फसवणुकीचा आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस; 42 कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिटकनेक्टचे सतिश कुंभाणीसह 7 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | Another Major Bitcoin Fraud Case Revealed FIR against 7 persons including Satish Kumbhani of Bitconnect in 42 crore fraud case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मुळ बिटकॉईनच्या गुंतवणुकीवर (Investment In Bitcion) त्याच्यापेक्षा अधिक बिटकॉईनचा परतावा (Return On Bitcoin Investment) मिळाला असल्याचे दर्शवून ते बिटकॉईन क्रिप्टो करन्सीच्या (Cryptocurrency) प्रॉझी स्किममध्ये (Ponzi Scheme ) गुंतवणूक करायला भाग पाडून एका वकिलाला तब्बल २२० बिटकॉईनला (किमान ४२ कोटी रुपये) गंडा (Cheating Case) घालण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budhruk) येथील एका वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी बिटकनेक्ट कंपनीचे (Bitconnect Company) मालक सतीश कुंभाणी (BitConnect’s Founder Satish Kumbhani),
एटीसीसी कॉईनचे मालक सतिश जेवरिया (Satish Javaria, owner of ATCC Coin),
दिखादो कॉईन रणजित सक्सेना (Dikhado Coin Ranjit Saxena), दिव्येश दर्जी, विरेश चरंतीमठ, राकेश दिव्येश दर्जी,
मेहुल पाचीगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१६ ते जुन २०२१ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना एटीसीसी कॉईन, दिखादो कॉईन व इतर खोट्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो,
अशी खोटी आमिषे दाखवून वेगवेगळ्या प्रॉझी स्किममध्ये बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
त्यानंतर त्यांच्या मुळ गुंतवणुक केलेल्या ५४ बिटकॉईनवर परतावा म्हणून १६६ बिटकॉईन मिळाल्याचे त्यांना भासविले (Fraud Case).
त्यानंतर दिव्येश दर्जी आणि विरेश चरंतीमठ यांच्या सांगण्यावरुन पुन्हा वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीच्या प्रॉझी स्किममध्ये २२० बिटकॉईन गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर एकही बिटकॉईन दिसून येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
सध्या एका बिटकॉईनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये इतका आहे.
त्याअर्थी त्यांच्या मुळ ५४ बिटकॉईनचे एकूण १० कोटी ४५ लाख रुपये इतकी सध्या किंमत आहे.
त्यांनी आपली २२० बिटकॉईन म्हणजे ४२ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : – Pune Crime | Another Major Bitcoin Fraud Case Revealed FIR against 7 persons including Satish Kumbhani of Bitconnect in 42 crore fraud case

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘आरएसएस संघराज्य’ या फेक खातेधारकावर पुण्यात FIR, जितेंद्र आव्हाडांनी केली होती कारवाईची मागणी

Maharashtra Monsoon Assembly Session | आता खरे मुख्यमंत्री कोण आहेत ? हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच – आदित्य ठाकरेंचा दावा

Maharashtra Monsoon Session | विधानभवनात शिंदे गटाची माघार, मात्र व्हिपवरून जुंपली

Related Posts