IMPIMP

Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडूच्या बनावट प्रमाणपत्रांवर बनला सहायक पोलीस उपनिरीक्षक, पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यात FIR

by nagesh
Maharashtra Police | Maharashtra amravati police sub inspector hangs himself family members accuse amravati police sub inspector of strangulation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडू (State level players) असल्याबाबतच्या बनावट प्रमाणपत्रांच्या (Fake certificate) आधारे पोलीस दलात नोकरी (Police job) मिळवणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फसवणूकीचा (Cheating) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दिनेश नवनाथ करांडे Dinesh Navnath Karande (रा. बीड) असे बनावट प्रमाणपत्र तयार करुन नोकरी मिळवणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दिनेश करांडे सध्या बीड येथील बिनतारी संदेश विभागात कार्यरत (Wireless Messaging Department Beed) आहे. करांडे यांनी 2015-16 मध्ये पोलीस दलात नोकरी मिळवली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अपर पोलिस महासंचालक व संचालक, दळण वळण व परिवहन कार्यालयामार्फत 2015-16 मध्ये रेडिओ यांत्रिकी विभागाची सहायक पोलीस
उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया (Recruitment) घेतली होती. या भरतीमध्ये करांडे याने 2012 मध्ये झालेल्या राज्य शुटींग बॉल (State Shooting
Ball) अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांक मिळवल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच महाराष्ट्र
स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या (Maharashtra Squash Racket Association) 2015 मधील स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याकडून खेळताना पहिल्या
क्रमांकाचे, 2015 मध्येच त्याने बीड जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांकाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन सादर केले होते. (Pune Crime)

करांडे याने बनावट प्रमाणपत्र सादर करुन पोलीस दलात नोकरी मिळवली होती. दरम्यान करांडे याने सादर केलेल्या प्रमाणपत्रासंदर्भात संबंधीत स्पर्धकांच्या आयोजकांकडे चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर विभागीय चौकशीमध्ये (departmental inquiry) करांडे हा दोषी आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार (API Sandeep Pawar) करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Crime | Assistant Sub-Inspector of Police on fake certificates of state level player, FIR in Pune after being exposed

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

e-SHRAM Portal | ‘या’ सरकारी योजनेत रजिस्ट्रेशन करताच होईल मोठा फायदा, ‘इथं’ जाणून घ्या स्कीम अन् सर्वकाही

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

Related Posts