IMPIMP

Pune Crime | हप्ता न दिल्याने ‘बिल्डर’ला मारहाण करुन टोळक्याने लुटले; कारची केली तोडफोड करणार्‍या चॉकलेट शिंदेसह 7 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | बांधकाम व्यवसायातून कमविलेल्या पैशातून १ लाख रुपयांचा हप्ता दिला नाही, म्हणून बिल्डरला वाटेत अडवून त्याला टोळक्याने मारहाण केली. त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन लोखंडी टॉमी, दगडाने फोडून कारच्या काचा फोडून मोडतोड करण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी कामशेत पोलिसांनी (Kamshet Police) धनेश ऊर्फ चॉकलेट शिंदे, रोशन ऊर्फ डिग्या शिंदे, अनिकेत  शिंदे, श्रीधर हुले, रिकु दाभाडे (सर्व रा. कामशेत, ता. मावळ) व त्यांच्या दोन साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षाच्या तरुण बांधकाम व्यावसायिकाने कामशेत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कामशेतमधील राव हॉस्पिटलच्या मागे फिर्यादीच्या घराजवळ शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली.

फिर्यादी हे मुळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon, Sangli) तालुक्यातील विसापूर गावचे राहणारे आहेत.
त्यांनी कामशेत परिसरात आपला बांधकामाचा व्यवसाय सुरु केला आहे. चॉकलेट शिंदे व त्याच्या टोळीने फिर्यादीने बांधकाम व्यवसायात कमविलेल्या पैशातून हप्ता म्हणून १ लाख रुपयांची देण्याची मागणी केली होती. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. फिर्यादी हे त्यांच्या लॅन्सर कारमधून शुक्रवारी दुपारी घरी जात असताना मारुती कारमधून आरोपी आले व त्यांनी फिर्यादी यांना अडविले.

लोखंडी टॉमी, कोयता व लाकडी काठ्यांनी त्यांना कारवर जोरजोरात फटके मारले. त्यामुळे फिर्यादी हे कारच्या बाहेर आल्यावर चॉकलेट शिंदे याने हातातील टॉमीने त्यांच्या पायावर मारहाण (Pune Crime) केली. त्यांच्या खिशातील ३७ हजार रुपयांचे पैशांचे पाकिट जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या कारच्या काचा काठ्यांनी व दगडांनी फोडल्या.
लोखंडी टॉमीने कारच्या पत्रे चेंबवुन नुकसान केले.
तसेच कारच्या जवळच असलेल्या दुचाकीची मोडतोड केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Pune Crime | attack on builder in kamshet police station area

हे देखील वाचा :

Pune Division Deputy Collectors Transfer | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

BJP vs NCP | अनिल देशमुखांना लपायला देखील राष्ट्रवादीने सुरक्षित जागा दिलीय का? भाजप नेत्याचा सवाल

Related Posts