IMPIMP

Pune Crime | विनयभंग करणार्‍याची कॉलर पकडल्याने अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | The sister's son tried to rape the woman and the girl by abducting her in anger

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | दुकानात खरेदी करणार्‍यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याने तिने
त्याची कॉलर पकडली. त्याचा राग मनात धरुन त्याने कारने मोटारसायकलला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) विनयभंग व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
(Pune Crime) करुन एकाला अटक केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

समीर अहमद सय्यद (वय ३८, रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीसह कॅम्पमधील एका इलेक्ट्रीकल्स दुकानात ११ जानेवारी रोजी खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी समीर याने फिर्यादींच्या गालाच्या रंगावरुन त्यांची जात विचारल्याने फिर्यादी यांनी आरोपीची कॉलर धरली. तेव्हा त्याने फिर्यादीच्या कमरेजवळ मिठी मारुन त्यांचा विनयभंग केला. (Pune Crime)

त्यानंतर दुसर्‍या दिवशी १२ जानेवारी रोजी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती मोटारसायकलवरुन साळवे गार्डन रोडवरुन जात होते. त्यावेळी आरोपीची कॉलर धरल्याचा राग मनात धरुन मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या ते जखमी झाल्यावर त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तो तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा शिवशंभोनगर येथील लोकांनी अडविल्यावर फिर्यादी यांनी तू अशी गाडी का चालवतोय, असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तेव्हा नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempt to kill by causing an accident by grabbing the collar of the molester; Incidents in Kondhwa  Molestation Case

हे देखील वाचा :

Omicron Symptoms | पोटाशी संबंधीत आहे ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण, आढळले तर व्हा सतर्क !

LIC Jeevan Labh Yojana | 252 रुपयांच्या गुंतवणुकीवर LIC ची ही योजना तुम्हाला देईल 20 लाखाची रक्कम, केवळ इतकी वर्षे करावी लागेल प्रतीक्षा

Crime News | धक्कादायक ! मुलगी जिवंत होईल म्हणून आई-वडिलांनी 2 महिने घरातच ठेवला मृतदेह

Related Posts