IMPIMP

Pune Crime | Rs 200 साठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो; टोळक्याकडून तरुणाला चाकू-दगडाने मारहाण, सिंहगड रोड परिसरातील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | डेकोरेशनचे थकलेले पैसे परत मागितल्याने चिडलेल्या एकाने साथीदारांना बोलावून दोनशे रुपयांसाठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो, असे म्हणून तरुणावर चाकू व दगडाने हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) सुनिल पुरी Sunil Puri (रा. धायरी – Dhayari) व त्याच्या चार साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सौरभ शिंदे Saurabh Shinde (वय २३, रा. धायरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य सुधीर कांबळे Ajinkya Sudhir Kamble (वय २५, रा. धायरी गाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३९/२२) दिली आहे. ही घटना धायरीतील दुर्गाकृपा हॉटेलसमोर (Durgakrupa Hotel) रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य कांबळे हा शिक्षण घेत असून त्याचा मित्र सौरभ शिंदे याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय (Event Management Business) आहे. रविवारी रात्री ते बोलत असतना सौरभ याला सुनिल पुरी याचा फोन आला. मी तुला तुझे बिल देतो, तू एकटाच ये, दुसर्‍या कोणाला पाठविले तर मी पैसे देणार नाही, असे म्हणून त्याने शिंदे याला बोलावले. त्यानुसार अजिंक्य व सौरभ हे दुर्गाकृपा हॉटेलजवळ गेले. तेथे पोहचल्यावर सौरभ याने सुनिल पुरीकडे डेकोरेशनचे थकीत बिलाचे पैसे मागितले. तेव्हा सुनिल पुरी याने तू दोनशे रुपयांसाठी वारंवार फोन करतोस, असे म्हणत थांब तुझा मर्डर करुन टाकतो, असे बोलून त्याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळात तेथे चार जण आले. त्या सर्वांनी मिळून हाताने व दगडाने सौरभ याला मारण्यास सुरुवात केली. तेव्हा अजिंक्य याने त्याला मारु नका असे म्हटले, पण त्याचे कोणी ऐकले नाही. (Pune Crime)

सौरभ तेथून पळत जात असताना सुनिल पुरी व चार साथीदारांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यावर खाली पाडून दगडाने मारहाण केली.
सुनिल पुरी याने चाकूने सौरभच्या पाठीत वार केला. डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले.
त्यानंतर ते तेथून पळून गेले. सौरभ दुर्गाकृपा हॉटेलसमोर रस्त्यावर पडला होता. त्याचे डोक्यातून, पाठीतून रक्त येत होते.
दुचाकीवरुन अजिंक्य याने त्याला नवले हॉस्पिटलमध्ये (Navale Hospital) आणले. तेथे त्याची शुद्ध हरपली.
त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये (Command Hospital) दाखल करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कणसे (Assistant Police Inspector Kanase) अधिक तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Attempt To Kille Murder Incident On Sinhagad Road Area

हे देखील वाचा :

Pune PMC Election 2022 | मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी ! त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला – महापालिका आयुक्त पथा प्रशासक विक्रम कुमार

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

Related Posts