IMPIMP

Pune Crime | हडपसरमध्ये ‘दिवाळी बोनस’ मागितल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
 Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | काहीही कारण नसताना दिवाळी बोनस मागून त्रास देणार्‍यांवर चिडून तिघांनी धारदार शस्त्राने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसरमधील (Hadapsar) तुकाईदर्शन येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तिघा जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सिताराम खंडु शिंदे (वय ३५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. निरंजन चित्रनाथ योगी (वय २२), तपीन दिलीप विश्वकर्मा(वय १९), शेरबहादूर ऊर्फ शेरे नवलसिंग विश्वकर्मा (वय २०, सर्व रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत तुळशीराम खंडु शिंदे (वय ४०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चायनिज गाडीवर कुक म्हणून काम करीत असून त्यांचे वडिल सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

तुकाई दर्शन येथील ग्लायडिंग सेंटरच्या पश्चिमेस असलेल्या भिंती लगत हे तिघे ६ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता थांबले होते.
त्यावेळी सिताराम शिंदे हा तेथे आला. त्याने आरोपी यांना दिवाळी बोनस मागितला.
कसला दिवाळी बोनस द्यायचा असे म्हणून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा चिडून त्यांनी गाडीवर असलेल्या धारदार शस्त्राने शिंदे यांच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर वार (Pune Crime) केला.
त्यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title: Pune Crime | Attempt to murder of young man in Hadapsar for demanding ‘Diwali bonus

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्‍यांना पडल्या बेड्या’; जाणून घ्या पुण्यात भल्या पहाटे नेमकं काय घडलं

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून 26 वर्षीय युवकाचा खून; दोघांवर FIR, तर एकजण पोलिसांच्या ताब्यात

ST Workers Strike | एसटी संपाचा तिढा सुटेना ! पुणे विभागातील 13 डेपो बंद; प्रवाशांची तारांबळ

Related Posts