IMPIMP

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मित्राच्या आजोबांना 4 वर्षापूर्वी 50 हजार रुपये उसने दिले होते़ त्यांच्याकडे पैसे आल्याचे समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितल्याने त्यांच्या नातवाने साथीदाराच्या मदतीने कोयत्याने (Pune Crime) डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
(Attempt to Kill) केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी अम्मार मुक्तार शेख Ammar Mukhtar Sheikh (वय 28, रा. आशियाना सोसायटी, सय्यदनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात
(Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल शेख Sahil Sheikh (वय 22), नौमान सय्यद आणि जमीर शेख Jamir Sheikh
(सर्व रा. हडपसर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडेदहा वाजता साहिल शेख याच्या
घरासमोर घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी साहिल शेख हे मित्र आहे. 4 वर्षांपूर्वी साहिलचे आजोबा मोहम्मद यांना 50 हजार रुपये उसने दिले होते. त्यावेळी साहिल हाही उपस्थित होता. त्याने पैसे परत करण्याची जबाबदारी घेतली होती. गेल्या आठवड्यात साहिलचे आईने त्यांचे राहते घर विकले. त्यामुळे साहिल व त्याचे आजोबा यांच्याकडे फिर्यादी पैसे परत मागत होता. परंतु तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. 26 जून रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी हे पान आणण्यासाठी फोरच्युन प्लाझा (Fortune Plaza) येथे गेले. तेथे साहिल होता. त्यांनी उसने पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा त्याने तु माझ्या आजोबांना पैसे दिले, त्यांना माग असे बोलला. तेव्हा त्याने आपण बरोबर जाऊ समोरासमोर बोलु असे बोलला. त्याने येण्यास नकार दिल्यावर फिर्यादी एकटेच त्याच्या आजोबांकडे गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला. त्याच वेळी साहिल, त्याचा मित्र नौमान सय्यद, साहिलचे मामा जमीर शेख हे तेथे आले.

साहिल याने फिर्यादींना बांबुने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. जमीर याने लाथाबुक्कयांनी मारहाण केली.
त्यावेळी साहिल म्हणाला की, “पैसे मांगता है क्या, तेरे को दिखाता हू, तेरे को आज जिंदा छोडुंगा नही,”
असे मोठ्या ओरडून पाठीवर, हातावर मारहाण केली. त्यावेळी नौमान याने “आज तेरा गेम बजा डालते है,”
असे बोलून कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात पहिला वार केला. तो त्याच्या उजव्या डोळ्याच्यावरील बाजूस लागला.
त्यानंतर नौमान याने कोयत्याचा दुसरा वार केला. तो उजव्या कानाच्या वरील बाजूस लागल्याने फिर्यादी जमिनीवर पडले.
फिर्यादी जीव वाचवण्यासाठी त्यांच्या तावडीतून निसटून बिल्डिंगच्या टेरेसवर पळत गेल. तसेच टेरेसचा दरवाजा लावून घेतला.
15 ते 20 मिनिटे टेरेसवर थांबले. त्यानंतर त्यांचा मित्राबरोबर हडपसर पोलीस ठाण्यात आले.
त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यावर 14 टाके घातले.
हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Attempting to kill a friend with a scythe as he demanded a refund of the loan given to his grandfather

हे देखील वाचा :

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी समजू नये’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा

Pune Crime | मांजरीत मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणीच्या नातेवाईकाने मुलाच्या आईवडिलांना केली बेदम मारहाण

Pune Crime | ‘गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला लागायचे’ असे म्हणत गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार; विश्रांतवाडी परिसरातील घटना

Related Posts