IMPIMP

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | Chandannagar police arrested the accused from Shegaon in molestation case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रस्त्याने जाणार्‍या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, पाठलाग करुन प्रसंगी भररस्त्यात त्यांची छेड
काढण्याचे (Molestation Case) प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. आता या रोड रोमियोची (Road Romiyo) मजल आणखीच वाढली असून
चहा पित बसलेल्या महिलांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांना अटक केली आहे. अमित इंद्र नाथ (वय ३०, रा. दत्तप्रसाद सोसायटी, आंबेगाव खु़) आणि लक्ष्मण रामबहादुर साहु (वय २७, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बु़ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी शिवणे (Shivne) येथील एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेगाव (Ambegaon) येथील आईसाहेब चहा विक्री स्टॉलसमोर २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मैत्रिण आईसाहेब चहा स्टॉल येथे चहा पित बसल्या होत्या. तेव्हा आरोपी शिट्टया वाजवत तेथे आले. फिर्यादी या बसल्या असताना जाणून बाजून ते फिर्यादीच्या मांडीवर येऊन बसले व त्यांच्या पोटाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन ढकलून देऊन मारण्याची धमकी (Pune Crime) दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Two in Molestation Case

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

Related Posts