IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी, 20 लाखाची मागितली खंडणी; 6 जण अटकेत, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | Big builder in Pune threatened using Deputy Chief Minister Ajit Pawar's mobile number, demanded Rs 20 lakh ransom; pune police crime branch arrest 6 criminals, find out the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder in Pune) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या (Pune Police Crime Branch) पथकाने सहा जणांना अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28,  रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बड्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता.

बिल्डरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अटक आरोपी यांनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फेक कॉल ॲप (Fake Call App) नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डर यांना फोन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगण्यात आले. बिल्डर यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका असे सांगितले. तसेच गोयल यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच गोयल यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर,
महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Big builder in Pune threatened using Deputy Chief Minister Ajit Pawar’s mobile number, demanded Rs 20 lakh ransom; pune police crime branch arrest 6 criminals, find out the case

हे देखील वाचा :

Pune Crime | कानाचा घेतला चावा, तोंडावर फेकली पातळ भाजी अन् स्क्रु डायव्हरने जखमी केले, कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

Corona Cases In India Today | कोरोनाच्या नवीन प्रकरणात 6.7 टक्के वाढ, मागील 24 तासात 2 लाख 64 हजारपेक्षा जास्त केस

Pune Crime | पुण्याच्या लोणीकंदमधील बाप-लेकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक; नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला, जाणून घ्या हत्येचं कारण

Related Posts