IMPIMP

Pune Crime Branch Police | घरफोडी करणाऱ्या सख्ख्या भावांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा ऐवज जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन शहरासह जिल्ह्यात घरफोडचे गुन्हे करणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट दोनला (Pune Crime Branch Police) यश आले आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाला देखील अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुणे शहरात (Pune Crime Branch Police) 7 ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून 9 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

युवराज अर्जुन डोणे (वय-26), अविनाश अर्जुन डोणे (वय-21 दोघे रा. मिरजगाव कवडे वस्ती, ता. कर्जत, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर नीलेश कुंदनमल झाडमुथ्था (वय-38 रा. आष्टी, बीड) असे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराचे नाव आहे.

शहरामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सराईत घरफोडी करणारे डोणे भाऊ कात्रज तलाव (Katraj Lake) परिसरात थांबल्याची माहिती अमलदार गजानन सोनुने (Gajanan Sonune) यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4, अलंकार, लोणीकंद, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 असे मिळून 7 घरफोडी केल्याची कबुली दिली.
तसेच चोरीचे दागिने निलेश झाडमुथ्था या सराफाला विकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, कटवणी, चाव्यांचा जुडगा, 200 ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण 9 लाख 40 हजार 050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी करत होते चोरी

आरोपी दिवसभर दुचाकीवरुन फिरून रेकी करत होते.
बंद घराचे कुलूप उचकटून ते चोरी करत होते.
चोरीचे दागिने (Stolen jewelry) ते आष्टीतील सराफ झाडमुथ्था यांना विविध कारणे सांगून
विक्री करत होते. तसेच चोरीदरम्यान दुचाकी ओळखू येऊ नये यासाठी ते नंबर प्लेटवर चिखल लावत होते.
आरोपींवर बारामती, अहमदनगर, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घरफोडीचे 10 गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्यांचा शोध घेत होते.
आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Addl CP Ashok Morale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendra Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Senior Police Inspector Krantikumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलीस अमलदार गजाजन सोनुने,
कादीर शेख, संजय जाधव, किशोर वग्गु, निखील जाधव, समिर पटेल, चंद्रकांत महाजन,
उत्तम तारु,मितेश चोरमोले, गोपाल मदने, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, चेतन गोरे यांनी केली.

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch seizes Rs 9 lakh for burglary

हे देखील वाचा :

Crime News | पोलीस कोठडीतील 25 वर्षीय आरोपीने घेतला गळफास, पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Pension System | नोकरी करणार्‍यांसाठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम, जाणून घ्या

EPFO | जर तुम्ही सुद्धा बदलला असेल जॉब तर ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF चे पैसे, घर बसल्या होईल काम

Related Posts