IMPIMP

Pune Crime Branch Police | बुलेट व दुचाकी चोरी करणारे दोनजण गजाआड, 12 गुन्हे उघड

by nagesh
Pune Crime Branch Police | Two persons arrested for stealing bullets and two bikes

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  पुणे शहर आणि ग्रमीण भागात बुलेट (Royal Enfield Bullet) आणि इतर वाहने चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक (Anti-robbery and vehicle theft squad) दोनने अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 85 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त करुन 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) ही कारवाई मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत केशवनगर मांजरी रोडवर करण्यात आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मारुती माधव गिरी (वय-22 रा. स.नं. 203 गणेश मंदीराजवळ, साडेसतरानळी, हडपसर मुळ रा. मुपो
नांदगाव ता. जि. परभणी), उमेश भारत चौगुले (वय-22 रा. ए.एम. कॉलेज मागे, साई अमर सोसायटी,
महादेवनगर मांजरी बुद्रुक, हडपसर मुळ रा. शनिवार पेठ, ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 चे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस नाईक शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांना दोन वाहन चोर केशवनगर मांजरी
रोडवरील जय गणेश पान शॉप टपरीसमोर उभे असून त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या
होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) गाडीची माहिती घेतली असता ती चंदननगर पोलीस ठाण्याच्या
(Chandannagar Police Station) हद्दीतून चोरली असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी एका साथिदाराच्या मदतीने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून 4 लाख 85 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या असून 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींनी हडपसर 6, लोणीकंद 1, सिंहगड रोड 1, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 दुचाकी
चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये 4 बुलेट आणि इतर दुचाकी आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta), सह
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt. Commissioner of Police Dr. Ravindra Shisve), अपर
पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner of Police Laxman
Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक
पाडवी, पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उद्य काळभोर, राजेश अभंगे, दिनकर
लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रमाणे, शाकीर खान, मनोज शिंदे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय
खरपुडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime Branch Police | Two persons arrested for stealing bullets and two bikes

हे देखील वाचा :

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत

Jalgaon Crime | जळगावमधील 2 तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या, प्रचंड खळबळ

Pune News | पुण्यातही सरकारने निर्बंध शिथिल करावेत; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा – शहर काँग्रेस उपाध्यक्ष विरेंद्र किराड

Related Posts