IMPIMP

Pune Crime | जर्मन शेर्फड कुत्रा चावल्याने मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; बाणेरमधील आलिशान सोसायटीतील घटना

by nagesh
Pune Crime | Case filed against owner for biting German Shepherd dog An incident in a luxurious society in Baner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | स्वत:च्या हौसेसाठी अनेक जण कुत्रा (Dog) पाळू लागले आहेत. मात्र, हे करताना ते समवेत
राहणार्‍या इतर शेजार्‍यांचा विचार करत नाही. त्यातून त्यांना धोका निर्माण झाल्याचे व कुत्रा चावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जर्मन
शेर्फड (German Shepherd) जातीचा कुत्रा रहिवाशी विभागात पाळण्यास मनाई असताना एकाने तो पाळला. त्याला मैदानात सोडून दिले असताना
त्याने ९ वर्षाच्या मुलाचा चावा घेऊन त्याला जखमी केले. (Pune Crime)

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) वतन कांबळे Vatan Kamble (वय ५५, रा. पोर्शिया पल्लोड फर्म, बाणेर रोड, बाणेर – Baner) या कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ३९ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ३४५/२२) दिली आहे. हा प्रकार पोर्शिया पल्लोड फर्म या सोसायटीमधील लहान मुलांच्या खेळाचे मैदानावर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.

फिर्यादी यांचा ९ वर्षाचा मुलगा सोसायटीचे गार्डनमध्ये (Society Garden) खेळत होता.
जर्मन शेर्फड जातीचा कुत्रा रहिवाशी विभागात ठेवणे कायद्याने मनाई आहे.
असे असताना वतन कांबळे यांनी जर्मन शेर्फड जातीचा कुत्रा पाळला.
या कुत्र्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होईल हे माहिती असतानाही त्यांनी तो लहान मुलांच्या खेळाचे मैदानात त्याला घेऊन गेले.
कुत्र्याला मोकळा सोडल्याने तो मैदानात खेळत असलेल्या ९ वर्षाच्या मुलाचा चावा घेऊन त्याला जखमी केले.
पोलीस हवालदार भिसे (Police Constable Bhise) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Case filed against owner for biting German Shepherd dog An incident in a luxurious society in Baner

हे देखील वाचा :

Pune Crime | म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक करणार्‍या भूमी कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल

Rain in Maharashtra | मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढील 8 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Pune Crime | पुण्यातील उच्चभ्रु परिसरातील स्पा सेंटरमधील ‘सेक्स’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चार तरुणींची सुटका

Related Posts