IMPIMP

Pune Crime | पुण्यात चांदणे गँगच्या टोळक्याचा पूर्ववैमनस्यातून गुंडावर हल्ला, खडकी बाजार परिसरात दहशत पसरवून जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | पूर्ववैमनस्यातून चांदणे गँगच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडावर काेयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खडकी बाजार (Khadki Bazar) येथील कसाई मोहल्लामधील मोहरमच्या मंडपात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता (Pune Crime) घडली. साहिल ऊर्फ भिंगरी समीर खान (वय १९, रा. खडकी बाजार) याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यावरुन पोलिसानी शुभम आगलावे, सलमान शेख, नकुल गायकवाड, प्रजय काळे, तरुण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून प्रतिक राहुल लोंढे (वय १८, रा. खडकी बाजार) याला अटक केली आहे. चांदणे गँग गेल्या काही वर्षांपासून खडकी बाजार परिसरात आपली दहशत पसरवून लुटमार करत असते. गेल्या वर्षी अशाप्रकारे खडकी बाजार परिसरातील दुर्गा वसाहतीत तलवारी, कोयता, हॉकी स्टीक घेऊन दहशत पसरवून एका तरुणावर करुन जबर जखमी केले होते. खडकी पोलिसांनी शुभम आगलावे याच्यासह ८ जणांना अटक
केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

साहिल खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. डिसेंबर २०२० मध्ये आरोपींनी फिर्यादीचे विरुद्ध पोलीस केस केली होती. खान हा शनिवारी मोहरमच्या मंडपात बसला असताना आरोपी मोटारसायकलवरुन ट्रीपलसीट आले. सलमान शेख याने फिर्यादीला खुन्न्सने का पहातो, असे म्हणून आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत. खडकी भागात आमची दहशत आहे. असे म्हणून आरोपींनी साहिल खान याला घेरले. सलमान शेख याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व चेहर्‍यावर तसेच पायाचे मांडीवर, हातावर मारुन जबर जखमी केले. फिर्यादी जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना त्याच्यावर दगड फेकून मारले व परिसरात दहशत पसरवून निघून गेले. खडकी पोलिसांनी (Khadki Police) बेकायदा जमाव जमवून दंगल माजवणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन प्रतिक लोंढे याला अटक केली आहे. पोलीस
उपनिरीक्षक साळवी अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Chandne gang attack on goons in Pune, attempts to spread terror in Khadki Bazaar area

हे देखील वाचा :

SBI Alert | PAN Card बाबत असा मेसेज येतोय? तर वेळीच व्हा सतर्क, अन्यथा…

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा पुन्हा वाढणार पगार, जाणून घ्या यावेळी किती होईल वाढ; ‘या’ पध्दतीनं करा कॅलक्युलेशन

PMRDA | ‘पीएमआरडीए’ने गावनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणात बदल करावा

Related Posts