IMPIMP

Pune Crime | पुण्यातील पोलिस निरीक्षकाची फसवणूक, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. खलीलउल्ला आयनुल्ला खान (Khalilullaha Aiyanulla Khan) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dengle) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden police station) गुन्हा दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक यांना १० डिसेंबर रोजी खान याने फोन करुन पोलीस बातमीदार (Police Informer)असल्याची बतावणी केली. दोघे जण मुंबईवरुन (Mumbai) त्यांचे गाडीमध्ये पिस्टल व चरस हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची बातमी देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्या बातमीच्या मोबदल्यात त्यांच्याकडून फोन पेद्वारे ५ हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात बातमी न देता पोलीस निरीक्षक व इतरांची फसवणूक केली.

या खान याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही दिवस बंडगार्डन परिसरात नाकाबंदी (Nakabandi in Pune) केली. गुप्तपणे पाळत ठेवली होती. प्रत्यक्षात ही बातमी खोटी होती. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल खान याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) अधिक तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Pune Crime | Cheating with Pune Police Inspector, Bundgarden police booked Khalilullaha Aiyanulla Khan in fraud case

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

Related Posts