IMPIMP

Pune Crime | ‘ऑनलाईन क्लास’वरुन वाद ! मुलाचा मोबाईल तोडला आणि पत्नीला केली बेदम मारहाण; कोंढव्यातील घटना

by nagesh
pune crime controversy over online class broke the boys mobile and beat his wife to death incidents in kondhwa

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : Pune Crime | कोरोना संसर्गामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. मुलांचे शिक्षण सध्या ऑनलाईन चालू आहे. मुले घरातच असल्याने पालकांचे त्यांच्या ऑनलाईन शिक्षणावरुन वादावादी वाढली आहे. पण एका वडिलांचा या ऑनलाईन शिक्षणावरुन पारा इतका वाढला की त्याने मुलाच्या हातातून मोबाईल घेऊन तो तोडून टाकला. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केलेल्या पत्नीला रॉडने मारहाण करुन कॅरम बोर्ड डोक्यात मारुन जखमी केले़. हा प्रकार कोंढव्यातील (Kondhwa) पारगेनगर येथील हिलटॉप बिल्डींगमध्ये २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. या कुटुंबातील ५ वर्षाच्या मुलाचा
ऑनलाईन क्लास सुरु होता. त्यावेळी त्याच्या वडिलाने ५ वर्षाच्या मुलाला रागावून ‘‘तू टाईमपास कर रहा है़
तुम्हारा पढाई पे ध्यान नही है़ मै तेरा मोबाईल फोड डालुंगा’’ असे म्हणून त्याचा मोबाईल बंद करुन खाली
टाकला. बाथरुमधील पाण्याचे बकेटमध्ये तोडून नुकसान केले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना शांत रहा असे
सांगितल्यावर त्याने पत्नीला हाताने, तोंडावर व नाकारवर मारहाण केली. यावरच घराचे खिडकीचे पडद्याचा
कर्टन रॉड काढून त्या रॉडने पत्नीला बेदम मारहाण केली. घरामध्ये ठेवलेला कॅरम बोर्ड उचलून तिच्या
डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे (Police Sub Inspector Prabhakar Kapure) तपास करीत आहेत.

Web Title : pune crime controversy over online class broke the boys mobile and beat his wife to death incidents in kondhwa

हे देखील वाचा :

Pune News | नवीन मोबाइल अ‍ॅप लॉन्च ! पुणेकरांना मिळणार प्रत्येक 15 मिनीटाला पावसाची अद्ययावत माहिती, शेतकऱ्यांनाही फायदा

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

SBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल

Related Posts