IMPIMP

Pune Crime | बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 28 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून 17 जणांना अटक (Arrest) केली आहे तर 11 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि. 4) बालेवाडी गावातील दसरा चौकात करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दसरा चौकात एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण (Kalyan) व मुंबई मटका जुगार (Mumbai Matka Gambling) पैशावर खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून खेळणारे व खेळवणारे 17 आणि फरार झालेल्या 11 जणांवर चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी या कारवाईत घटनास्थळावरुन 8 हजार 950 रोख 60 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल, 70 हजार रुपयांची दुचाकी, 13 हजार 100 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 52 हजार 050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जुगार खेळविणारे अटक आरोपी

वसंत रामलिंग शिंदे (वय  -32 रा. बालेवाडी), रवींद्र धोंडीबा गजधाने (वय – 43 रा. भोसरी), दिपक खंडू म्हात्रे (वय – 42 रा. काळेवाडी), महेश निघंना तलवार (वय – 32 रा. पिंपळे सौदागर)

जुगार खेळणारे अटक आरोपी

सखाराम राघो पाडळे (वय – 45 रा. म्हाळूंगे), बबन आयलाजी वडमारे (वय – 51 रा. वाकड), विश्वास लक्ष्मण गायकवाड (वय – 42 रा. सांगवडे, पुणे), धनंजय श्रीरंग सरोदे (वय – 30 रा. बालेवाडी), ध्रुपद गणपत खंखरे (वय – 40 रा. कस्पटे वस्ती, वाकड), महेंद्र सुदाम ओव्हाळ (वय – 56 रा. पिंपळे गुरव), सोमनाथ भिंगा सपकाळ (वय – 38 रा, बालेवाडी), गजानन मधुकर फुलारी (वय – 31 रा. बालेवाडी), कुमार सखाराम लोहार (वय – 32 रा. रहाटणी), संदीप भाऊसाहेब कोळेकर (वय – 45 रा. बालेवाडी), सुधाकर निवृत्ती वाघमारे (वय – 42 रा. थेरगाव), महेश रतिलाल कदम (वय – 38 रा. हिंजवडी), अखलास मुनाफ शेक (वय – 45 रा. म्हाळुंगे)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फरार झालेले आरोपी

जुगार अड्डा मालक कमलेश उर्फ पिनूभाई भगवान ससाणे (रा. बालेवाडी), भाऊ डांगे यांच्यासह 9 जण घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार कर्पे, राणे, मोहीते, चव्हाण, पुकाळे, माने, कांबळे, चव्हाण, जमदाडे, कोळके, कोळप, पवार, पाटील यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Crime Branch raided a gambling den in Balewadi

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मंत्रिमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार का रखडला, दीपक केसरकर यांनी सांगितलं कारण

Smelly Underarms | घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का? या उपायांद्वारे होईल सुटका

Related Posts