IMPIMP

Pune Crime | गरजूंच्या जमिनी पैशाच्या अमिषाने लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात, शिक्रापूर पोलिसांत 7 जणांवर गुन्हे; चौघांना अटक तर तिघे फरार

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे जिल्हयातील गरजू असलेल्या व्यक्तीला पैशाच्या आमिष दाखवून जमिनींचे कुलमुखत्यार पत्र तसेच खरेदीखत करून घेत जमिनी परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) पर्दाफाश करत सात जणांवर गुन्हे दाखल करून चौघांना अटक केली आहे. अरुण कैलास गवळी, विजय भाऊसाहेब घावटे, सोमनाथ फक्कड बोऱ्हाडे, दत्तात्रय भाऊसाहेब यादव, राहुल सुखदेव गायकवाड, विकास प्रकाश थिटे, शुभम गोविंद पाचर्णे असे गुन्हे दाखल (Pune Crime) करण्यात आलेल्याची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शिरुर (Shirur) येथील बाबुरावनगर येथील बाबू मोरे यांना पैशाची अडचण असल्याची
माहिती गुन्हे दाखल झाले असलेल्या व्यक्तींना समजताच त्यांनी बाबू मोरे यांना तुम्हाला आम्ही पैसे देतो.
मात्र आम्हाला काहीतरी तारण द्या असे म्हणून त्यांच्या दहा गुंठे जमिनीचे कुलमुखत्यार पत्र करून
घेण्यासाठी अरुण गवळी, विजय घावटे, सोमनाथ बोऱ्हाडे, दत्तात्रय यादव, राहुल गायकवाड, विकास थिटे, शुभम पाचर्णे यांनी बाबू मोरे यांना तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे आणले.
सदर ठिकाणी त्यांना प्रथम दहा गुंठे जागेचे कुलमुखत्यार पत्र समोर दाखवून दिवसभर दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात बसवून ठेवले.
त्यांनतर अचानकपणे वेगळीच कागदपत्रे समोर ठेवून घाई गडबड करून गोंधळ
घालत कार्यालय बंद होणार आहे, लवकर सह्या करून घ्या कागद तुम्हाला भेटणार आहे.

घरी गेल्यानंतर वाचा असे म्हणून बाबू मोरे यांच्या तब्बल १३२ गुंठे जमिनीचे खरेदीखत करून घेतले
आणि त्यांनतर लगेचच त्यापैकी ९१ गुंठे जमिनीची विक्री दुसऱ्या व्यक्तीला करून टाकली.
दरम्यान च्या काळामध्ये मोरे यांनी संबंधित व्यक्तींना दुय्यम निबंधक कार्यालयातील
कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली तसेच मोरे यांनी
वारंवार सदर व्यक्तींकडे याबाबत विचारणा केली असताना त्यांना दमदाटी करण्यात आली.

त्यामुळे आपली पैशाच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाबू यलाप्पा मोरे वय २७ वर्षे रा. बाफना मळा, बाबुराव नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अरुण कैलास गवळी वय ३३ वर्षे रा. मोटेवाडी ता. शिरुर जि. पुणे, विजय भाऊसाहेब घावटे वय २६ वर्षे रा. बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे, सोमनाथ फक्कड बोऱ्हाडे वय २७ वर्षे रा. रामलिंग ग्रामीण ता. शिरुर जि. पुणे, दत्तात्रय भाऊसाहेब यादव वय ३३ वर्षे रा. यादववाडी
ता. पारनेर जि. अहमदनगर, राहुल सुखदेव गायकवाड रा. कोहोकडी ता. पारनेर जि. अहमदनगर,
विकास प्रकाश थिटे रा. केंदूर ता. शिरुर जि. पुणे, शुभम गोविंद पाचर्णे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यापैकी अरुण गवळी, विजय घावटे, सोमनाथ बोऱ्हाडे, दत्तात्रय यादव या चौघांना अटक करत त्यांना
शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे
आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

सदर टोळीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता…….

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या आरोपींवर यापूर्वी अशाच
पद्धतीने नागरिकांच्या फसवणूक केल्याबाबत काही गुन्हे दाखल असून या व्यक्तींनी अशाच
पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता शिक्रापूर पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Web Title : Pune Crime | Crimes against 7 persons in Shikrapur police in the net of police who looted the lands of the needy for the sake of money; Four arrested while three absconded

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा पावसाची विश्रांती; जाणून घ्या कधी होणार वापसी

Viral Video | कलयुग ! मुलगा पैशांसाठी भररस्त्यात आईला फरफटत होता, कुत्र्याने दाखवली इमानदारी, पहा Video

COVID-19 3rd Wave | नीति आयोगाचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘सप्टेंबरमध्ये दररोज आढळू शकतात कोरोनाचे 4-5 लाख नवे रूग्ण’ ! 2 लाख ICU बेड तयार ठेवण्यास सांगितलं

Related Posts