IMPIMP

Pune Crime | वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल (Pistol) आणि एक जीवंत काडतुस (cartridge) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धनकवडी येथील विणकर सभागृह (vinkar sabhagruha dhankawadi) यशवंतनगर येथे शुक्रवारी (दि.27) केली. महेश उर्फ मिट्या राजेंद्र नवले (वय-23 रा. 9 पर्वती दर्शन पुणे) असे अटक (Arrest) केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 16 ऑगस्ट रोजी सुरज अडागळे याला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीनसह एक जिवंत काडतुस जप्त केले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हे पिस्टल महेश उर्फ मिट्या नवले (Mahesh alias Mitya Navale) याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी नवले हा मागील एक वर्षापासून फरार होता.

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शुक्रवारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अमंलदार अजय थोरात (Ajay Thorat), अमोल पवार (Amol Pawar) व इम्रान शेख (Imran Sheikh) यांना फरार आरोपी नवले हा धनकवडी येथील विणकर सभागृहाजवळ (vinkar sabhagruha dhankawadi pune) येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी महेश उर्फ मिट्या नवले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने एक पिस्टल आणि काडतुस घरात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून 41 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि काडतुस जप्त केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरोपी महेश उर्फ मिट्या नवले हा सराईत गुन्हेगार असून त्याने एकाचा खुन करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्यापासून जीवाला धोका असल्याने जवळ पिस्टल बाळगल्याची कबुली आरोपीने दिली.
आरोपीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबर दुखापत, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे,
तडीपारीचा आदेशाचा भंग करणे असे एकूण 9 गुन्हे दत्तवाडी (Dattawadi), सहकारनगर (Sahakarnagar),
स्वारगेट (Swargate), शिवाजीनगर (Shivajinagar Police Station) पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

ही कारवाई आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त (अति. कार्यभार अपर पोलीस आयुक्त, गुन्हे) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुरेंद्र देशमुख (ACP Surendra Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सनिल कुलकर्णी (PSI Sanil Kulkarni), पोलीस अमंलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, आय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, मीना पिंजन यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | criminal arrested for absconding for over a year; Cartridge with pistol seized from Crime Branch

हे देखील वाचा :

Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर

3rd Wave Of Corona | ‘कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’, ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Related Posts