IMPIMP

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला (lombard general insurance) सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले असून कंपनीच्या ग्राहकांचा डाटा चोरुन पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक (Pune Crime) करण्याचे प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत. याप्रकरणी लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे तपास अधिकारी विशाल काटकर (वय ५०, रा. बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ जुलैपासून आतापर्यंत घडला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सायबर चोरट्याने कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरला. त्यानंतर त्यांच्या पॉलिसीचे नुतनीकरण करायचे आहे, अशा ग्राहकांना त्यांनी कंपनीच्या नावाने बनावट ई मेल पाठविला. तसेच या पॉलिसी ग्राहकांना कंपनीच्या पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगून पॉलिसी या वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी दिल्या जातात. त्यामध्ये वाहन विमा, प्रॉपर्टी विमा, फायर विमा, आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या पॉलिसीचे नुतनीकरण करुन दिले जातात, असे ग्राहकांना सांगून त्यांना पेमेंट करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक दिला. ग्राहकांनी त्यावर पैसे भरले. परंतु, त्यांच्या पॉलिसीचे नुतनीकरण झाले नाही. त्यामुळे ग्राहकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीने केलेल्या तपासात अशा प्रकारे कंपनीचा डाटा चोरुन ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहरासह देशातील आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber Police Station) पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Cyber thieves ‘target’ Lombard General Insurance Company; He cheated many people across the country by saying that he was speaking from the company

हे देखील वाचा :

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

Related Posts