IMPIMP

Pune Crime | जुन्नर तालुक्यात भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा ! गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर (Anant Gramin Sahkari Patsanstha) भरदिवसा सशस्त्र दरोडा (armed robbery) टाकण्यात आला. बुधवारी (दि.24) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात (shooting) पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा (manager) मृत्यू (Death) झाला आहे. राजेंद्र दशरथ भोर Rajendra Dasharath Bhor (वय-52) असे मृत्यू झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात (Pune Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मिळालेल्या माहितीनुसार, 14 नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्गालगत (Pune-Nashik Highway) आहे.
दुपारी दीडच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर (Ankita Neharkar) हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला.
त्यांनी भोर यांच्याकडे पैशांची मागणी करत गोळीबार केला.
जखमी झालेल्या राजेंद्र भोर यांना नारायणगाव येथे उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

चोरट्यांनी पतसंस्थेतील अडीच लाखांची रोकड लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
दरोड्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Pune Crime)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Crime | daytime armed robbery junnars infinite credit union manager killed shooting pune crime news pune rural police

हे देखील वाचा :

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम तुम्हाला देईल दरमहा पैसे, इतक्या वर्षात होईल 1.50 लाखाचा फायदा

BSNL Prepaid Plan | बीएसएनएलने वाढवली 60 दिवसांसाठी ‘या’ प्लानची वैधता; जाणून घ्या प्लान

Monalisa Bold Dance | मिनी स्कर्ट परिधान करुन मोनालिसाचा पुन्हा एकदा जलवा, शेअर केला व्हिडीओ

Related Posts