IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याने शिक्षिकेचा मृत्यू; पोलीस पतीच्या तक्रारीवरून डॉक्टरवर FIR

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील वाकड परिसरातील (Wakad Area) एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. आजाराचे योग्य निदान न करता मनाला वाटेल तसे उपचार केले. उपचारांमध्ये निष्काळजीपणामुळे पोलिसाची पत्नी असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू (Died) झाला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. मंजुषा संतोष भागवत (Manjusha Santosh Bhagwat) (वय 43) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. ही घटवा लाईफ लाईन क्लिनिक (Life Line Clinic), मेन रोड वाकड, विशाल नगर, जगताप डेअरी येथे 1 ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत घडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संतोष तुकाराम भागवत (Santosh Tukaram Bhagwat) (वय 48, रा. गुलमोहर कॉलनी, विशालनगर, जगताप डेअरी, औंध -वाकड रोड, पुणे) यांनी या प्रकरणी रविवारी (10 एप्रिल) रोजी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून डॉ. प्रदीप एच. पाटील (Dr. Pradeep H. Patil) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याबाब माहिती अशी की, फिर्यादी संतोष भागवत हे पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) विशेष शाखेत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मंजुषा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना 1 सप्टेंबर 2018 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी मंजुषा यांना न्युमोनिया झालेला असताना डॉ. प्रदीप पाटील याने आजाराचे योग्य प्रकारे निदान केले नाही. निष्काळजीपणाने फक्त रक्ताची तपासणी करून प्लेटलेट्स कमी झाल्याचा निष्कर्ष काढला. त्याचबरोबर मनाला वाटेल त्या पद्धतीने उपचार केले. त्यानंतर 4 सप्टेंबर 2018 रोजी मंजुषा यांची प्रकृती जादा बिघडली. त्यामुळे संतोष भागवत यांनी पुढील उपचारासाठी थेरगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान मंजुषा यांचा 5 सप्टेंबर 2018 रोजी मृत्यू झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, न्युमोनियाच्या आजाराने मंजुषा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, फिर्यादी संतोष भागवत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जावरून चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे PSI Sangeeta Gode) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | death of woman teacher due to improper treatment crime against doctor on complaint of police husband

हे देखील वाचा :

Weather Update | काही राज्यांना उन्हाचा चटका तर ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; IMD

Pune-Ahmednagar Highway Accident | कारला धडकून लक्झरी बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; कारचालक ठार, 25 प्रवासी जखमी

Pune Crime | पुण्यात प्रेमसंबंधातून प्रेमिकेचा खून; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात, 9 विद्यार्थी जखमी; उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना

Related Posts