IMPIMP

Pune Crime | लग्नासाठी वेळ मागून घेतल्याने अश्लील फोटो आईवडिलांना पाठवून केली बदनामी; जळगावमधील तरुणावर कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) प्रस्तापित केले. त्यानंतर तिने लग्नासाठी वेळ मागितल्याने चिडून त्याने दोघांच्या शारीरीक संबंधाचे फोटो, व्हिडिओ तिच्या आई वडिल, मित्रमैत्रिणींना पाठवून बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी कोंढव्यातील (Kondhwa) एका ३४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तौफिक अहमद भैय्यासाहेब देशपांडे (वय ३२, रा. रामनगर, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देशपांडे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी नोव्हेंबर २०२० पासून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी यांनी लग्नासाठी वेळ मागितल्याने त्याने फिर्यादी यांच्या आई वडिलांना धमकाविले. त्यांच्यातील शारीरीक संबंधाचे फोटो, व्हिडिओ २५ एप्रिल रोजी पहाटे त्यांच्या आईच्या मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅप केले. त्यानंतर ५ मे रोजी फिर्यादीचे वडिल, मित्र, मैत्रिणी, बहीण, नातेवाईक यांना पाठविले. त्यानंतर फिर्यादी यांनी बदनामी केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Defamation by sending pornographic photos to parents for taking time for marriage; Kondhwa police has registered a case against a youth from Jalgaon

हे देखील वाचा :

MLA Ravi Rana On Thackeray Government | रवी राणांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील’

Power Outage Pune | …म्हणून रविवारी पहाटे पुण्यातील नगर रोड, विमान नगर, कल्याणी नगर, येरवडा भागातील वीज पुरवठा बंद राहणार

Pune Crime | पुण्यातील शिवणे गावात टोळक्याचा राडा ! तरुणाला कोयत्याने मारहाण करुन केली गाड्यांची तोडफोड

Related Posts