IMPIMP

Pune Crime | पुण्यात बिर्याणीवरुन पुन्हा वाद, जाणून घ्या नेमका प्रकार

by nagesh
Pune Crime | dispute over biryani again pune what exactly happened Hadapsar Police Arrest three

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – बिर्याणीवरुन वाद झाल्याच्या घटना पुण्यात (Pune Crime) यापूर्वी घडल्या आहे. तो वाद संपत नाही तोच आता पुन्हा एकदा बिर्याणीवरुन वाद (Biryani Dispute Again) झाला आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका केटरिंग व्यावसायिकाला तीन जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण (Beating) केली. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) हडपसर परिसरातील बोराटे नगरमध्ये बुधवारी (दि.12) रात्री घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तिघांना अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऋषिकेश समाधान कोलगे (वय-23), शुभम हनुमंत लोंढे (वय-23), विनायक परशुराम मुरगंडी (वय-21) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मैनुद्दीन जलील खान (वय-42) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील काळे बोराटे नगर (Kale Borate Nagar) परिसरात फिर्यादी यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. याठिकाणी ते बिर्याणी इतर खाद्य पदार्थ तयार करुन पार्सल देण्याचे काम करतात. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीकडून बिर्याणी पार्सल घेतली. फिर्यादी यांनी बिर्याणीचे पैसे मागितल्यावर आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने त्यांना बेदम मारहाण केली. तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन दुकानाची तोडफोड केली. मैनुद्दीन खान यांनी गुरुवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Pune Crime | dispute over biryani again pune what exactly happened Hadapsar Police Arrest three

हे देखील वाचा :

LPG Cylinder Subsidy | प्रत्येक महिन्याला बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सबसीडी जमा होतेय? असं करा चेक, जाणून घ्या

Shahapur Nagar Panchayat Election | शहापूर नगर पंचायत निवडणूक ! शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जादूटोणा; परिसरात उडाली खळबळ

CM Uddhav Thackeray | ‘महाविकास आघाडीतील नेते मला खांद्याला खांदा लावून साथ देतायत’

Related Posts