IMPIMP

Pune Crime | मालमत्तेच्या वादातून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला; साडेचार लाखांचा ऐवज चोरुन घरावर लावले स्वत:चे नाव

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मालमत्तेवर (Property) सासु (Mother-in-law) सुनेत (Daughte-In-Law) वाद होता सासु मुलीकडे गेल्याची संधी साधून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला. त्याच्यावर स्वत:च्या नावाचा फलक लावला. घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी हडपसर येथील गाडीतळजवळ (Gadital Hadapsar) राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २६ वर्षाच्या सुनेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १९ ते २३ जुलै दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची सुन यांच्यात मालमत्तेवरुन वाद आहे. फिर्यादी या लहान मुलीसोबत त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन घराचा दरवाजा बदलला. त्याच्यावर तिने स्वत:च्या नावाचा फलक लावला.

घरातील लोखंडी कपाटातील ९ तोळे ३ ग्रॅम सोने (Gold Jewellery), ५७० ग्रॅम चांदीचे दागिने (Silver Jewellery),
कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
सासुच्या तक्रारीनुसार सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस उपनिरीक्षक गोसावी (Police Sub-Inspector Gosavi) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Due to a property dispute, the daughter-in-law changed the door of the house; Instead of stealing four and a half lakhs, he put his own name on the house

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकार सुस्साट ! 24 दिवसांतच काढले तब्बल 538 GR

Pune Crime | लग्नाचा शगुन पडला 11 लाखांना; नायजेरियन फ्रॉडमध्ये आय टी इंजिनिअर तरुणीची फसवणूक

Sudhir Mungantiwar | ‘…मग तुम्ही मोदींचा फोटो का वापरला ?’, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Related Posts